केसांच्या वाढीसाठी अंडे (Egg) हे वरदान मानले जाते, प्रथिनांचा (Protein) उत्तम स्त्रोत यामधून मिळतो. आरोग्यासाठी अंडी जितकी चांगली तेवढीच केसांसाठी (Hair Care) देखील खूप फायदेशीर मानली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? अंड्यांसोबतच त्याची साले देखील तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. त्याची साल त्वचेसाठी तसेच केसांसाठी खूप चांगली मानली जाते. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी अंड्याचा उपयोग कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. अंड्यामधील बायोटिन आणि बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनमुळे (vitamin) केस जाड होण्यासही मदत मिळते. केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अंड्याचे हेअर मास्क वापरू शकता. अंड्यापासून तयार केलेल्या हेअर मास्कची माहिती आपण जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे केसांना पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळू शकते.
सामान:
अंडे - १
आवळा पावडर - २ चमचे
पद्धत:
अंडे आणि आवळा पावडर एकत्र करा. ते चांगले मिसळून घ्या नंतर ते केसांना व केसांच्या मुळांना लावा. लावल्या नंतर, हे सुमारे ३० मिनिटे सोडा.
यानंतर आपले केस शैम्पूने धुवा. जर केस खडबडीत आणि कडक असतील तर योक आणि बल्क या दोन्हीचा वापर करा परंतु, जर का तुमचे केस तेलकट असतील तर फक्त योकचा वापर करा आठवड्यातून एकदा हे हेअर पॅक नक्की ट्राय करा.
टीप:
केस तेलकट असल्यास बल्कचा वापर टाळा.
केस जर जास्तच कोरडे असतील तर दोन्हीचा वापर अवश्य करा.
फायदे:
अंड्यामधील बायोटिन आणि बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनमुळे केस जाड होण्यासही मदत मिळते.
अंड्यामुळे केस गळती सुद्धा कमी होते.
या पॅकमधील आवळा पावडरमुळे केसांचा काळा रंग टिकून राहण्यास मदत होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.