Menstrual cup चा वापर करतांना 'घ्या' काळजी
Menstrual cup चा वापर करतांना 'घ्या' काळजी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Menstrual cup चा वापर करताना 'घ्या' काळजी

दैनिक गोमन्तक

मासिक पाळी (Menstruation) हा स्त्रियांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. तसेच ही एक नैसर्गिक प्रकिया आहे. या काळात महिलांना अनेक वेदनांना आणि समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक महिलांना मूड स्विंग (Mood swings) , पोटात दुखणे, अंग दुखणे, कंबर दुखणे, अशक्तपणा, यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासोबतच पॅड (Pad) बदलण्याच्या वेळा पाळाव्या लागतात, वेळेवर पॅड नाही बदले तर इन्फेक्शन (Infection) आणि ओव्हर ब्लडिंगच्या समस्या असल्यास, कामाच्या ठिकाणी या वेळा पाळणे कठीण होऊन बसते. म्हणूनच आजकाल अनेक महिला Menstrual Cup चा वापर करतात. पण याचा वापर करणे आरोग्यासाठी लाभदायी आहे का? हे जाणून घेवूया सविस्तरपणे

Menstrual cup म्हणजे काय

हा कप घंटाकाराचा असतो. हा कप सिलिकॉन किंवा रबरपासून बनवतात. याचे रियूजेबल आणि डिसपोजेबल असे दोन प्रकार आहे. रियूजेबल कप पाच वर्ष वापरू शकता. हा कप आपले वय आणि आकारानुसार बाजारत मिळतात.

कसा वापरावा?

हा कप फोल्ड करून योनिमार्गातून आत टाकावा. याची एक बाजू हाताच्या चिमटीत पकडून बाहेर काढता येतो. त्यातील स्त्राव टॉयलेटमध्ये स्वच्छ करून घ्यावे. कप आत टाकताना हात स्वच्छ असावे. हाताला कोणतेही क्रीम लावलेले नसावे. मासिक पाळी (Menstruation) संपल्यानंतर कप स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात टाकून स्वच्छ करावे. हा कप आपण 6 ते 12 तास वापरू शकतो. कप बद्दलच्या सूचना प्रत्येक बॉक्सवर दिलेली असते. त्या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

* Menstrual cup चे फायदे

  • या कपची किंमत स्वस्त असते.

  • टॅम्पोन्सपेक्षा सुरक्षित असते.

  • टॅम्पोन्सप्रमाणे योनि या कपमुळे कोरडी पडत नाही.

  • या कपचा वापर केल्याने दुर्गंधी येत नाही.

* Menstrual cup तोटे

* हा कप वापरतांना कधी कधी गोंधळ उडू शकतो.

* अनेक वेळा हा कप बाहेर काढणे कठीण होऊ शकते.

* सिलिकॉन किंवा रबर कपच्या वापरामुळे अनेकांना अॅलर्जी होऊ शकते.

* Menstrual cupची अशी काळजी घ्यावी

वापरलेलेल कप गरम पाण्याने स्वच्छ करावे. दिवसातून दोन वेळा कप बदलावे. रियूजेबल कप टिकाऊ असतात. त्याची योग्य काळजी घेतल्यास 6 ते 10 वर्ष वापरू शकता. परंतु डिस्पोजेबल कप एकदाच वापरता येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT