Heart attack: ‘गोल्डन आवर’ देवू शकतो रूग्णाला जिवनदान

Heart attack
Heart attack
Published on
Updated on

भारतात हृदयविकाराचा आजार असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आहार आणि जीवनशैलीतील उलथापालथीमुळे हा रोग आणखी गंभीर होत आहे. म्हणून वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उपचाराबरोबरच जीवनशैलीही बदलणे आवश्यक आहे. खाण्याच्या सवयी दुरुस्त करणे आणि शारीरिक हालचाली वाढवणे. यात, डॉक्टर बर्‍याचदा 'गोल्डन अवर' चा उल्लेख करतात, ते काय असतं हे प्रत्येक रुग्णाला हे जाणून घेणे महत्वाचे आहे.(Heart attack What is a Golden Hour)

गोल्डन अवर म्हणजे काय आणि हृदयरोग्यांसाठी हा का महत्वाचा आहे ते आपण जाणून घेवूया.डॉक्टर याबद्दल सांगतात की एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला हे कळताच त्वरित त्याच्यावर उपचार सुरू केले पाहिजेत. रुग्णाला त्वरित योग्य उपचार मिळाले तर त्याचे प्राण वाचू शकते. हार्ट अटॅकच्या पहिल्या तासाला गोल्डन अवर म्हणतात. याबाबत त्यज्ञांनी अनेक सल्ले दिले आहेत. हार्ट अटॅक नंतर हृदयाच्या नाडीत अडथळा येताच संपूर्ण हृदयात त्याचा फेलाव होण्याचा धोका असतो.

हृदयविकाराचा झटका म्हणजे काय ?
हृदयाच्या ज्या भागामध्ये नाडीत अडथळा निर्माण होतो. तो भाग नष्ट होण्यास सुरवात होते. जर त्वरित त्याच्यावर उपचार केले गेले, जर नाडी ओपन होवून रुग्णाचे प्राण वाचू शकतात. हे काम इंजेक्शनद्वारे किंवा अँजिओप्लास्टीद्वारे केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत हृदय रोगाचा आजार असलेला रुग्ण वाचू शकतो. हृदयविकाराच्या झटक्यानंतर पहिल्याच तासात बहुतेक रुग्णांचा मृत्यू होतो. हृदयविकाराच्या झटक्यांपैकी 50% मृत्यू पहिल्या एका तासामध्ये होतात. म्हणूनच, पहिल्या तासात लक्षणे ओळखणे आणि त्यावर उपचार करणे खूप महत्वाचे आहे. लक्षणे ओळखा आणि ताबडतोब या रुग्णाला रुग्णालयात घेऊन जा जेथे उपचारांची सुविधा उपलब्ध असते.

उपचार कसे करावेत?
दुसरा प्रश्न असा आहे की हृदयविकाराचा झटका आल्यास उपचार कसे करावे? सुरुवातीला अ‍ॅस्पिरिनसारखी औषधे पाण्यात विरघळली जातात. ज्या रुग्णालयात एंजिओप्लास्टीची सुविधा आहे त्यामध्ये रुग्णाची एंजियोग्राफी केली जाते. परंतु जर रुग्णालय अशा गावात असेल जेथे मोठे रुग्णालय किंवा कॅथ लॅबची सुविधा नाही तर त्या ठीकाणी इंजेक्शन देऊन त्यावर उपचार केले जाऊ शकते. प्रारंभिक उपचार दरम्यान इंजेक्शनमुळे 60-70% यश ​​मिळते. एंजिओप्लास्टी केल्यास, 90% पेक्षा जास्त यश मिळते.

गंभीर लक्षणे कोणती?
प्रथम लक्षण हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत सौम्य वेदना होतात. छातीत जडपणा येतो, छातीत अस्वस्थता जाणवते. काही मिनिटांपेक्षा जास्त काळ हा त्रास होत असतो. या वेदना जबडा आणि खालच्या भागापर्यंत जाते. हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटातही वेदना होतात. थोड्या वेळाने ते ठीक होईल असे आपल्याला वाटते पण तसं होत नाही. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर, छातीत वेदना होतात, घाम येतो, व्यक्ती चिंताग्रस्त वाटते, बरेच लोक उलट्या देखील करतात. अचानक दम लागतो. अशी लक्षणे 10-15 मिनिटांनंतरही कमी होत नाही, तेव्हा हे समजून घ्या की हे हृदयविकाराचं हे एक मोठा लक्षण आहे. ताबडतोब रुग्णालयात जा, आपला ईसीजी करून घ्या आणि योग्य उपचार करा. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com