Sunday Special | Appam Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sunday Special: नाश्त्यात बनवा स्वादिष्ट पोहे अप्पे, नोट करा रेसिपी

Sunday Special Recipe: सकाळी नाश्तात पोह्यापासून अप्पे बनवू शकता.

Puja Bonkile

sunday special recipe how to make poha appe home

सकाळी नाश्त्यात पोहे खायला सर्वांना आवडते. पोह्यांपासून पोहे कटलेट, पोहे पकोडे आणि पोह्याचे लाडू इत्यादी अनेक प्रकारच्या मसालेदार पदार्थ बनवता येतात.

पण अशा काही रेसिपी आहेत ज्या फार कमी लोकांना माहित आहेत. आज पोह्यापासून झटपट अप्पे कसे बनवावे हे जाणून घेऊया.

अप्पे खायला खूप चवदार असतात. अप्पे हे कुरकुरीत गोळे असतात, जे आतून मऊ आणि फुगीर असतात आणि बाहेरून हलके कुरकुरीत असतात.

जर तुम्हाला काही वेगळे करून पहायचे असेल, तर एकदा पोहे ॲपे बनवून पहा आणि हिरव्या चटणीबरोबर आस्वाद घेऊ शकता.

पोहे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पोहे - 1 वाटी

कांदा - 1 बारीक चिरलेला

टोमॅटो - 1 बारीक चिरलेला

हिरवी मिरची - 2 बारीक चिरून

कोथिंबीर - बारीक चिरून

मोहरी - अर्धा टीस्पून

मॅगी मसाला - 1 टीस्पून

मीठ - चवीनुसार

पाणी - गरजेनुसार

कृती

  • पोहे ॲपे बनवण्यासाठी एका भांड्यात पोहे गाळून घ्या आणि पाण्याने स्वच्छ धुवावे.

  • नंतर त्यात मीठ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा.

  • मिक्स केल्यावर हलक्या हाताने पाणी घाला आणि सतत ढवळत एक गुळगुळीत मिश्रण तयार करा. लक्षात ठेवा की पीठ जास्त पातळ किंवा घट्ट नसावे.

  • नंतर अप्पे स्टँडमध्ये थोडे तेल लावून गरम करण्यासाठी ठेवा आणि स्टँड गरम झाल्यावर चमच्याच्या मदतीने अप्पे पीठ घाला.

  • नंतर दोन्ही बाजूंनी शिजू द्या आणि अप्पे व्यवस्थित शिजल्यावर ताटात काढा आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अप्पे तळू शकता. हे करण्यासाठी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात तेल तापायला ठेवा.

  • नंतर एक एक करून अप्पे टाका आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. गरम तेल वापरल्याने अप्पे कुरकुरीत होतात.

  • सर्व काही तळून झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून वरून मॅगी मसाला टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT