Paneer Tikka Sandwich Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sunday Special: रविवारची करा हेल्दी सुरूवात, ब्रेकफास्टमध्ये बनवा पनीर टिक्का सँडविच

पनीर आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे सकाळी नाश्त्यात याचा समावेश करू शकता.

Puja Bonkile

Sunday Special Recipe: रविवार खास बनवण्यासाठी तुम्ही सकाळच्या नाश्त्यात सँडविच बनवण्याचा विचार करत असाल तर हा पदार्थ बनवु शकता. सकाळचा नाश्ता असे किंवा संध्याकाळचा हा पदार्थ तुम्ही आवडीने खाऊ शकता. एक चविष्ट सँडविच तुमची भुक भागवू शकते. पनीर आरोग्यासाठी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया पनीर टिक्का सँडविच कसे बनवाल.

  • पनीर टिक्का सँडविच बनवण्यासाठी साहित्य

ब्रेड स्लाइस

पनीर

कांदा

शिमला मिरची

तूप

मोहरी तेल

काश्मिरी लाल मिरची पावडर

धने पावडर

गरम मसाला

आमचूर पावडर

जिरे पावडर

कसुरी मेथी

हंग कर्ड

आले लसूण पावडर

भाजलेले बेसन

लिंबाचा रस

मेयोनिज

टोमॅटो केचप

चिली फ्लेक्स

ऑरेगॅनो

मीठ

काळे मीठ

  • पनीर टिक्का सँडविच कसे बनवाल

पनीर टिक्का सँडविच बनवण्यासाठी सर्वात पहिले पनीर, कांदा आणि सिमला मिरचीचे लहान चौकोनी तुकडे करावे.

आता एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि नंतर त्यात काश्मिरी लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, आमचूर पावडर, जिरेपूड, मीठ, काळे मीठ, कसुरी मेथी, दही, आले लसूण पावडर, भाजलेले बेसन आणि लिंबाचा रस मिक्स करावे.

आता या मिश्रणात पनीर, सिमला मिरची आणि कांदा घालावे.

काही वेळ हे फ्रीजमध्ये ठेवावे.

आता पनीर टिक्का ओव्हनमध्ये शिजवा किंवा तुम्ही पॅनमध्येही शिजवू शकता.

ब्रेडवर लावण्यापूर्वी स्प्रेड तयार करावे.

यासाठी मेयोनिजमध्ये टोमॅटो केचप घालावे आणि नंतर त्यात चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो मिक्स करावे.

हा स्प्रेड ब्रेडवर लावा आणि दुसऱ्या स्लाइसवर पनीर भरून पसरवा.

आता झाकण ठेवून मग तव्यावर भाजून घ्यावे.

पनीर टिक्का सँडविच तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT