Summer Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Tips: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी अशा प्रकारे घ्या त्वचेची काळजी, अन्यथा त्वचा होईल टॅन

Summer Skin Care: उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी आरोग्यासह त्वचेचीही काळजीही घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Summer skin care Tips how to protection skin from sun

उन्हात बाहेर जाण्यास सर्वजण टाळतात. त्वचा काळी पडण्याच्या भीतीने अनेक लोक उन्हाच्या संपर्क कमी येतात. सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा ॲलर्जीसारख्या समस्या सुरू होतात. सूर्यापासून निघणाऱ्या किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचा काळी पडते, सुरकुत्या पडू शकतात आणि कर्करोगही होऊ शकतो.

सनबर्न

उन्हात जाताच टॅनिंग आणि सनबर्न सारख्या समस्या निर्माण होतात. बहुतेक लोक उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी विशेष स्किन केअर रूटीनचे पालन करतात. परंतु त्याचा फायदा होत नाही. जर तुम्ही उन्हात बाहेर जाणार असाल तर तसे करण्यापूर्वी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

योग्य आहार घ्यावा

उन्हाळ्यात योग्य आणि पोषक आहार घेणे गरजेचे असते. याचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर देखील होतो. आहारात फळं, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करावा. सूर्याच्या अतिनिल किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. महत्वाचे काम असल्यास घराबाहेर जावे अन्यथा बाहेर जाणे टाळावे.

फुटवेअर

उन्हाळ्यात बाहेर जाताना पांढरे किंवा स्किन कलरचे सॉक्स घालावे. तसेच नेहमी शुज घालावा. यामुळे पाय चांगले राहतील आणि टॅन होणार नाही.

खास उपाय कोणते?

उन्हात बाहेर जाण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे आधीच सनस्क्रीन लावावे. तसेच दर 2 तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा, यामुळे त्वचेचे संरक्षण होईल. उन्हात बाहेर जाताना पांढरे किंवा लाइट रंगाचे कपडे घालावे. याशिवाय डोक्यावर टोपी किंवा स्कार्फचा वापर करावा. जेणेकरून सूर्यप्रकाश थेट डोक्यावर पडू नये. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी आणि नंतर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT