Summer Skin Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Skin Care: चेहऱ्याचे टेक्सचर सुधारण्यासाठी 'या' ट्रिकचा करा वापर

उन्हाळा सुरू झाला असून चेहऱ्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

summer skin care easy ways improve your skin texture read full story

हिवाळा कमी झाला असून उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचेचीही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक लोकांना चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स, काळे डाग यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्या कमी करण्यासाठी महागडे प्रोडक्ट अनेक लोक वापरतात. पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. तुम्ही काही छोट्या गोष्टी लक्षात ठेऊन देखील त्वेचेचा टेक्सचर सुधारू शकता.

एक्सफोलिएशन

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. तसेच धुळ आणि प्रदुषणामुळे चेहऱ्याचा पोत खराब होतो. ते काढून टाकण्यासाठी, नियमितपणे एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एक्सफोलिएट करावे. हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करा. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

तेल वापरावे

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी दररोज बदाम तेल, खोबरेल तेलाने मालिश करावी. यामध्ये सीबम प्रोडक्शन कंट्रोल असते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते.

त्वचा मॉइश्चरायझर ठेवावी

तेलकट त्वचा असलेले लोक मॉइश्चरायझर लावणे टाळतात. कारण त्यांना असे वाटते की यामुळे चेहरा जास्त तेलकट दिसतो. परंतु मॉइश्चरायझर तेलाचे उत्पादन नियंत्रित करते आणि त्वचा कोरडी होण्यापासून देखील रोखते. तुम्ही दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर वापरू शकता.

सनस्क्रीन वापरावे

उन्हाळ्यात सनस्क्रीन लावणे गरजेचे असते. केवळ टॅनिंगपासून संरक्षण करत नाही तर त्वचेचा पोत देखील सुधारतो. एसपीएफ वापरल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यापासून बचाव होतो आणि डागही कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT