Face Pack For Summer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Face Pack For Summer: उन्हाळ्यात ड्राय स्किनसाठी बेस्ट फेस पॅक, घरीच करु शकता ट्राय

उन्हाळात त्वचेची काळजी घेण्यासाठी दोन प्रकारचे फेस पॅक उत्तम आहेत.

दैनिक गोमन्तक

Face Pack For Dry Skin in Summer: उन्हाळाच्या झळा सुरू झाल्या आहेत. तसेच त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. लोक वेगवेगळे मार्ग शोधू लागतात, ज्यामुळे त्वचा लगेच फ्रेश आणि ग्लोइंग दिसू लागेल.

या ऋतूमध्ये त्वचा अधिक संवेदनशील बनते. त्यामुळे त्वचेला थंडावा जाणवणे आणि फेस पॅक तुमच्या त्वचेवर जास्त हार्श नसावा हे सर्वात महत्त्वाचे आहे. काही लोक उन्हाळ्यात (Summer) चेहरा थंड ठेवण्यासाठी बर्फ लावतात. जर तुमची त्वचा ड्राय असेल तर या दोन फेस पॅकच्या मदतीने तुम्ही त्वचेला चमकदार बनवू शकता.

  • दह्यापासून बनवलेले फेसपॅक

उन्हाळ्यात (Summer) ड्राय स्किनवर उपचार करण्यासाठी दही फेस पॅक हा एक चांगला मार्ग आहे. दही ओलावा टिकवून ठेवते आणि तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मुलायम बनवते.

फक्त एक चमचा मधात 2 चमचे दही मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावाे. पाण्याने धुण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या. मऊ, कोमल आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी महिन्यातून 2 वेळा हा पॅक लावा.

Curd Face Pack
  • पपईपासून बनवलेले फेस पॅक

पपई (Papaya) हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्यात अँटी एजिंग गुणधर्म देखील आहेत. गुळगुळीत पेस्ट बनवण्यासाठी पपईचे काही तुकडे फक्त मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवा.

आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. साधारण 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून तीन वेळा लावू शकता.

Papaya for Face Pack

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT