Stomach Heat
Stomach Heat Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Stomach Heat: उन्हाळ्यात पोटात जळजळ का होते? या लोकांनी घ्यावी खास काळजी

Puja Bonkile

summer health care tips how to get rid stomach heat digestive issues in summer

उन्हाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात अनेक लोकांना सर्वात जास्त शरीरात पाण्याची कमतरता आणि डिहायड्रेशनची समस्या जाणवते. शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असेल तर भरपूर पाणी आणि फळं खावी असा सल्ला डॉक्टर देतात. तुम्हालाही उन्हाळ्यात पोटात जळजळ किंवा उष्णता वाटत असेल तर यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

पोटातील जळजळ कशी कराल कमी

  • भरपुर पाणी प्यावे

उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. दिवसभरात 3 ते 4 लिटल पाणी प्यावे.

  • रसाळ फळं खावी

उन्हाळ्यात बाजारांमध्ये टरबूज, खरबुज मोठ्या प्रमाणात मिळतात. या हंगामी फळांमध्ये पाण्याचे मुबलक प्रमाण असते. यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होणार नाही.  

  • ताक प्यावे

उन्हाळ्यात फक्त दही न खाता त्यापासून ताक बनवून प्यावे. उन्हाळ्यात दुपारी चहा किंवा कॉफी न पिता शरबत, ताक, लस्सी पिऊ शकता. यामुळे पोटात होणारी जळजळ कमी होते.  

  • पालेभाज्यांचे सेवन

भरपूर हिरव्या भाज्या खा, त्यामुळे पोटाची उष्णता कमी होते. यामुळे शरीराला दीर्घकाळ हायड्रेट राहते. उन्हाळ्यात शक्य असल्यास फक्त घरात मिळणारे पदार्थ खावे. त्यामुळे आतडे व्यवस्थित काम करतात. 

पोटात जळजळ होत असेल तर पुढील लक्षणे दिसतात.

  • हाडांमध्ये वेदना

पोटात उष्णतेमुळे हाडांमध्ये वेदना आणि कडकपणा येतो. कारण हाडांमधील आर्द्रता कमी होऊ लागते. त्यामुळे जडपणा आणि वेदना होण्याची समस्या आहे. हाडांमध्ये पाणी असणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यामुळे त्यात ओलावा टिकून राहील. पोटात जळजळ किंवा उष्णता वाढली असेल तर पाणी कमी होऊ लागते. 

  • पाय आणि तळवे मध्ये जळजळ

शरीरात पाण्याची कमतरता असेल तर पाय आणि तळव्यांमध्ये जळजळ होते. जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा जळजळ वाढते. जर तुम्ही पायात जळजळ होण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी समस्या असू शकते. यासाठी सर्वात पहिले तुमचा आहारात बदल करावा. तसेच रोज झोपतांना थंड पाण्याने पाय स्वच्छ धुवून झोपावे.  

  • तोंडात फोड येणे

तोंडावर व्रण वारंवार होत असतील तर ते पोटात उष्णतेचे लक्षण असू शकते. चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा पोटात उष्णता वाढल्याने किंवा पित्त वाढल्याने फोड येऊ लागतात. 

पोटात जास्त जळजळ होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच योग्य ते उपचार सुरू करवे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT