Sun Tan Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sun Tan Reduction: त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी लावा या घरगुती गोष्टी

उन्हाळ्यात त्वचा अधिक टॅन होते. टॅनिंगची समस्या दुर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी बनवलेल्या आयुर्वेदिक बॉडी स्क्रबची मदत घेउ शकता.

दैनिक गोमन्तक

Home Remedies For Sun Tan Reduction: उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचेच्या देकील अनेक समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात स्किन टॅनिंगची समस्या अधिक जाणवते. यासाठी अनेक उपाय देखील केले जातात.

सनस्क्रीन न लावता बाहेर जाणे किंवा अनेक वेळा योग्य प्रमाणात न लावल्यामुळे देखील स्किन टॅन होते. सन टॅनिंग मुळे त्वचेवर पॅचेस तयार होउन चमक कमी होते.

सन टॅनिंग कमी करण्यासाठी बाजारात कितीतरी प्रोडक्ट असले तरी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून ते सहज काढता येऊ शकते. सन टॅन काढण्यासाठी कोणत्या गोष्टींपासून हे होममेड बॉडी स्क्रब कसे बनवायचे हे जाणून घेउया.

  • बेसन

उन्हाळ्यात बेसन हे सन टॅन काढण्यासाठी उत्त्म पर्याय आहे. एका वाटीत तीन लहान चमचे बेसन, एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि लिंबूचा रस घेऊन मिक्स करावे. यात चिमुटभर हळद मिक्स करावी. हे सर्व नीट मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 15 मिनीटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हे स्क्रब वापरू शकता.

Besan for Weight Loss
  • मध

एक लहान चमचा मध घेऊन त्यात दोन चमचे दही मिक्स करा. हे चेहऱ्याला लावून 15 मिनीटांसाठी ठेवा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. उत्तम रिझल्टसाठी तुम्ही हे रोज लावू शकता.

Honey
  • काकडी

काकडीला बारीक करुन त्याचा रस काढून घ्यावा. काकडीचा ज्यूस दुधात मिक्स करावा. तुम्ही ब्लेंड केलेली काकडी देखील दुधात मिक्स करू शकता. ही पेस्ट चेहरा आणि हातांवर लावावी. 15 मिनीटांनंतर पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. उत्तम रिझल्टसाठी तुम्ही दिवसातून दोन वेळा हे लावू शकता.

Cumber
  • एलोवेरा जेल

कोरफळ त्वचेसाठी फायदेशीर असते. रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावावा. सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. असे नियमितपणे करावे.

alovera
  • टोमॅटो

टोमॅटो बारिक करून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 15 मिनीट ठेवावे. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोन ही पेस्ट लावावी. टोमॅटो स्क्रबमुळे स्किन टॅनिंग तर दूर होउन त्वचा चमकदार होते.

Tomato

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT