Heart Attack Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Diseases Affecting Multiple Organs: काही आजार असे असतात जे एकाच वेळी शरीराच्या एकापेक्षा जास्त अवयवांना हानी पोहोचवू शकतात.

Manish Jadhav

Multiple Organ Failure Diseases: जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला असे वाटते की शरीराच्या केवळ एकाच भागावर परिणाम होतो. परंतु विज्ञान सांगते की, काही आजार असे असतात जे एकाच वेळी शरीराच्या एकापेक्षा जास्त अवयवांना हानी पोहोचवू शकतात. त्यापैकी सर्वात संवेदनशील म्हणजे हृदय (Heart), यकृत आणि मूत्रपिंड. शरीरातील हे तीन महत्त्वाचे अवयव आहेत. जर एकाला हानी पोहोचली तर इतर दोन अवयवांवर देखील परिणाम होऊ शकतो.

काही आजार हे सिस्टेमिक असतात, म्हणजेच ते शरीरातील विविध अवयवांना हानी पोहोचवतात, ज्यामुळे हृदय, यकृत आणि मूत्रपिंड एकाच वेळी खराब होऊ शकतात. आरएमएल हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष गिरी यांनी या आजारांबद्दल सविस्तर सांगितले आहे.

1. सेप्सिस: सेप्सिस हा एक गंभीर संसर्ग आहे, जो बॅक्टेरियामुळे होतो. तो रोगप्रतिकारक शक्तीला ओव्हरएक्टिव्ह करतो आणि परिणामी अनेक अवयव निकामी होतात. यामध्ये, यकृत मूत्रपिंड आणि हृदयाला हानी पोहोचते.

2. हेपॅटोरेनल आणि कार्डिओहेपॅटिक सिंड्रोम: जेव्हा यकृतामध्ये सिरोसिस किंवा कोणताही जुनाट आजार होतो तेव्हा त्याचा मूत्रपिंडातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो, याला 'हेपॅटोरेनल सिंड्रोम' म्हणतात. दुसरीकडे, जर हृदय निकामी होऊ लागले तर यकृताला सूज येते आणि ते खराब होऊ लागते, ज्याला 'कार्डिओहेपॅटिक सिंड्रोम' म्हणतात.

अनेक-अवयव निकामी का होतात?

डॉ. गिरी सांगतात, हृदय, यकृत आणि मूत्रपिंड हे तीन अवयव एकमेकांशी जोडलेले आहेत. हृदय रक्त पंप करते जे यकृत आणि मूत्रपिंडांना ऑक्सिजन आणि पोषण प्रदान करते. यकृत रक्त स्वच्छ करते आणि शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी काढून टाकते. जेव्हा एखादा अवयव एखाद्या आजाराने ग्रस्त असतो तेव्हा ते इतर अवयवांच्या कार्यात अडथळा आणते. उदाहरणार्थ, जर हृदय कमजोर असेल तर यकृत आणि मूत्रपिंडांना योग्य प्रमाणात रक्त मिळत नाही, ज्यामुळे त्यांच्या निकामी होण्याचा धोका वाढतो.

प्रतिबंधात्मक उपाय

मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर इत्यादी जुनाट आजारांवर नियंत्रण ठेवा.

नियमित आरोग्य (Health) तपासणी करा- जसे की एलएफटी, केएफटी, ईसीजी, लिपिड प्रोफाइल.

जास्त औषधे घेऊ नका- अनेक औषधांचा थेट परिणाम यकृत आणि मूत्रपिंडांवर होतो.

शरीरात सूज येणे, श्वास लागणे, पोट फुगणे किंवा लघवी कमी होणे- या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

25 जणांचा मृत्यू झालेल्या ‘बर्च’ला परवानगी केवळ सरपंचांचा निर्णय नाही! वकिलांचा युक्तिवाद; अटकपूर्व जामिनावर होणार सुनावणी

Goa Farmers Policy: ‘शेतकरी’ची व्याख्या बदलणार! विपणन मंडळाचा कारभार कृषी खात्‍याकडे; हिवाळी अधिवेशनात विधेयक होणार सादर

Goa Politics: खरी कुजबुज; पालेकरांकडे भाजपचाही पर्याय?

Goa politics: युती न केल्‍यानेच ‘आप’ला निवडणुकीत फटका! पालेकरांचा दावा; सांताक्रूजमधील मतदारांना विश्‍‍वासात घेऊन निवडणार पर्याय

Bordem: 'हा आमच्या जीवाशी खेळ'! बोर्डे-डिचोलीत गटारात टाकली जलवाहिनी; संतप्त नागरिकांनी काम पाडले बंद Video

SCROLL FOR NEXT