Health Tips
Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: तणाव असह्य झालाय? तणावमुक्तीसाठी 'हे' छोटे-छोटे उपाय ठरतील फायदेशीर

Ganeshprasad Gogate

मानसिक स्वास्थ जपण्यासाठी मानसिक शांतता जपण्यावर भर दिला पाहिजे. कारण सध्या तणाव हा जवळपास प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग बनत चालला आहे. तणाव दूर करण्यासाठी तुम्ही छंद जोपासू शकता किंवा ध्यान धारणा करू शकता किंवा आवडीच्या गोष्टी करण्यावर भर देऊ शकता. सध्या पुरेसा वेळ असल्यामुळे आवडत्या गोष्टी करणं सहज शक्य आहे.

प्रमाणापेक्षा वाढलेला ताण माणसाच्या वैयक्तिक जीवनावर वर्चस्व गाजवू लागतो आणि त्यामुळे चिडचिड होऊ लागते. रागात माणसाला प्रत्येक गोष्टीची चिडचिड येते आणि अशावेळी झोप न येण्यासारख्या समस्या सुरू होतात. अशा परिस्थितीत छोटे-छोटे बदल तुमचे जीवन सुधारून ते तणावमुक्त करू शकतात. कामाचा ताण जीवनावर वर्चस्व गाजवण्यापासून कसा रोखता येईल ते जाणून घेऊया.

हलके - फुलके साहित्य वाचा -

ताणतणाव घालवण्यासाठी मन शांत, स्थिर असणं आवश्यक आहे. विनोदी साहित्य, नाटके यांचं वाचन करावं. विविध कथा, कादंबऱ्या वाचाव्यात. याने मनःशांती नक्की मिळू शकते. एखाद्या विषयात गुंतलेले,गुरफटलेले मन शांत व्हायला मदत होते.

आठवड्याचे प्लॅनींग करा-

जीवनात समतोल निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी आठवडाभर आधीच योजना बनवा जेणेकरून तुम्हाला जास्त विचार करावा लागणार नाही. अगोदर काही काम केल्याने आठवड्याच्या शेवटी कोणतेही दडपण येणार नाही आणि तुम्ही आरामात राहाल.

संवाद साधा-

तणावासारखी परिस्थिती खूप गंभीर असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांशी सुसंवाद वाढवा. अशा वेळी हीच माणसं खूप उपयोगी पडतात. तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच ताण कमी करण्यासाठी कामाचा प्राधान्यक्रम ठरवा, याचा खूप फायदा होईल.

संगीत ऐका-

एखादं आवडतं गाणं, शास्त्रीय संगीत ऐकण्याचा प्रयत्न करा. संगीत हे तणाव दूर करण्याचे उत्तम साधन आहे. शास्त्रीय संगीतातील असे काही राग आहेत जे ताण तणाव दूर करण्यासाठी मदत करतात

स्वतःला वेळ द्या-

व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकवेळा आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला काही मिनिटे वेळ देणे आवश्यक आहे. कामाच्या दरम्यान, पॉडकास्ट ऐकणे, मजेदार व्हिडीओ पाहणे आणि आराम करणे यामुळे तणाव कमी होतो. सुट्टीच्या दिवशी फोन आणि लॅपटॉपपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT