Soaked Raisins Benefits: द्राक्षे आपल्यापैकी अनेकांचे आवडते फळ आहे. मात्र हे फळ काही काळापुरतेच उपलब्ध असते. मात्र दाक्षापासून बनवलेले बेदाणे ज्याला आपण मनुकेदेखील मिळतो मात्र वर्षभर आपल्याला बाजारात मिळते. या मनुक्याचे आपल्या शरिराला अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊयात या मनुक्याचे फायदे काय आहेत.
हाडे मजबूत होतात
बेदाण्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात. यासोबतच हाडांच्या दुखण्याची समस्याही दूर होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
मनुकामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. जर तुम्ही दररोज भिजवलेले मनुके खाल्ले तर तुमचे शरीर आजारांपासून सुरक्षित राहते.
अॅनिमिया दूर राहतो
स्रियांमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमियाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांनी भिजवलेले मनुके खाणे फायदेशीर ठरते.
मनुक्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अशक्तपणा दूर होतो. रोज भिजवलेले मनुके खाल्ल्याने अॅनिमियापासून बचाव होतो.
पोट स्वच्छ राहते
ज्यांना बद्धकोष्ठता आणि गॅस-अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांनी रोज सकाळी भिजवलेले मनुके खावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले फायबर पचन सुधारण्याचे काम करते. याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
याशिवाय अँटीऑक्सिडंट म्हणूनदेखील मनुके काम करतात. तुमच्या यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीदेखील हे भिजवलेले बेदाणे उपयुक्त ठरतात. डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्याचे कामदेखील करत असते.
स्रियांसाठी गरोदरपणात हे काळे बेदाणे उपयुक्त ठरत असल्याचे म्हटले जाते. इतकेच नाही तर तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी देखील हे मनुके उत्तम काम करतात. भिजवलेल्या बेदाण्याबरोबरच त्याचे पाणीदेखील अनेक गुणधर्मांनीयुक्त असते. हे पाणी पिल्याने आपल्या शरिरातील विषारी घटक दूर होण्यास मदत होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.