Winter Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Skin Care Tips : घरगुती गोष्टींच्या वापराने दूर होतील पिंपल्स आणि डार्क सर्कल; वापरून पाहा हे उपाय

Winter Skin Care Tips :कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते.

दैनिक गोमन्तक

Winter Skin Care Tips : तुमच्या चेहऱ्यांवर डाग आणि डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. काही घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही या समस्यांपासून सुटका करू शकता. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते. विशेषबाब म्हणजे कॉफी डार्क सर्कल्सपासून ते पिंपल्सपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करते.

तज्ञांच्या मते, तुम्ही आपल्या स्कीनकेअरच्या नित्यक्रमात कॉफीचा समावेश करू शकता. कॉफी फेस पॅकचा वापर केल्याने रक्ताभिसरण चांगले होते. तसेच अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. कॉफी त्वचेसाठी कशी फायदेशीर आहे आणि ती कशी वापरली जाऊ शकते हे जाणून घेऊया. (Winter Skin Care Tips at home)

  •  डार्क सर्कल

कॉफीमध्ये नैसर्गिकरित्या ब्लीचिंग घटक असतात. एक चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा मध आणि व्हिटॅमिन ई तेलाचे काही थेंब मिक्स करा. हे मिश्रण काळजीपूर्वक आपल्या डोळ्यांखाली लावावे. हे मिश्रण 15 मिनिटे ठेवावे. नंतर चेहरा स्वच्छ धुवावा. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल.

Winter Skin Care Tips
  • पिंपल्सवर गुणकारी

कॉफीच्या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते. कारण कॉफीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणांचा समावेश असतो. यासाठी एका बाऊलमध्ये 3 चमचे कॉफी पावडर आणि 2 चमचे ब्राऊन शुगर मिक्स करावे. त्यात 3 चमचे नारळ पाणी घालावे. याचे मिश्रण चांगले मिक्स करावे. या फेस पॅकने चेहऱ्यावर चांगले मसाज करा. 10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन ग्लो वाढण्यास मदत मिळते.

Winter Skin Care Tips

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! 300 हून अधिक पोलिस तैनात; मतदारसंघांमध्ये चुरस

Beach Shack sealed: हणजूण किनाऱ्यावरील प्रसिद्ध ‘कर्लिस बीच शॅक’ला टाळे! CRZ चे उल्लंघन; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

'..मला 3 बुरखाधारी व्यक्तींनी अडवले'! शिक्षक ओरडतील या भीतीपोटी विद्यार्थ्याने रचले अपहरणनाट्य; अभ्यासाच्या ताणामुळे केला बनाव

Goa Nightclub Fire: 'क्लबमधील आगीच्या दुर्घटनेला कर्मचारी जबाबदार'! लुथरा बंधूंनी झटकले हात; पोलिस तपासात असहकार्य

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT