Winter Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Winter Care Tips: हिवाळा सुरु झाला असून थंडी वाढली आहे. हिवाळ्यात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Manish Jadhav

Winter Care Tips: हिवाळा सुरु झाला असून थंडी वाढली आहे. हिवाळ्यात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. यासाठी आजकाल बाजारात आलेल्या अनेक प्रकारच्या क्रिम आपण वापरतो किंवा काहीजण घरगुती उपायही करतात. चला तर मग हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया...

कोमट पाण्याने आंघोळ करा

हिवाळ्यात आपण सर्सासपणे गरम पाण्याने आंघोळ करणे पसंद करतो. पण तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास तुमची त्वचा कोरडी आणि निर्जिव दिसते. पाणी कोमट झाल्यावर नेहमी शॉवर घ्या. यामुळे तुमची त्वचा मऊ राहील.

क्लिनिंग

त्वचेची क्लिनिंग करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्वचा स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात हरबरा डाळीचे पीठ, एक चमचे हळद, 2 चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावा तसे केल्यास तुमची त्वचा चमकदार होईल.

आहार

फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने समृद्ध संतुलित आहार घ्या. योग्य आहार घेतल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हिवाळ्यात विशेषत: बेरीज् (स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी) खाणे फायद्याचे ठरते. बेरीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT