Shopping Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shopping Tips: व्हेगन ब्युटी प्रोडक्ट खरेदी करताय लक्षात ठेवा 'या' गोष्टी

अनेक ब्रँड्सची व्हेगन ब्युटी प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. जर तुम्हीही ते खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

Puja Bonkile

Shopping Tips: आजच्या काळात लोकांनी केवळ त्यांचे अन्नच नाही तर त्वचेची काळजी घेण्याची पद्धत देखील वीगन बनविली आहे. आजकाल बाजारात अनेक ब्रँड्स आहेत जे व्हेगन प्रोडक्ट पुरवत आहेत. व्हेगन प्रोडक्ट कोणत्याही प्रकारचे प्राणी किंवा त्यांचे डेरिव्हेटिव्ह जसे की दूध, अंडी किंवा मध इत्यादी वापरत नसल्यामुळे, लोकांना ते वापरणे आवडते. असे मानले जाते की व्हेगन प्रोडक्ट प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी चांगली असतात. आजही आपल्या सर्वांना योग्य व्हेगन प्रोडक्ट कसे निवडायचे हे माहित नाही. तर आज तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कसे खरेदी करावे हे जाणून घेऊया.

सर्टिफिकेट तपासावे

व्हेगन ब्युटी प्रोडक्टची शुद्धता तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या पॅकवरील विगन प्रमाणपत्र तपासणे. PETA, Vegan Action किंवा Vegan Society सारख्या संस्थांकडून प्रमाणपत्र घेतलेले असावे.


इंग्रीडिएंट चेक करावे

जेव्हा तुम्ही व्हेगन ब्युटी प्रोडक्ट खरेदी करता तेव्हा तुम्ही त्याच्या लेबलवर लिहिलेले घटक काळजीपूर्वक वाचणे फार महत्वाचे आहे. हे तुम्हाला त्या उत्पादनामध्ये कोणत्या प्रकारचे घटक वापरले गेले आहेत हे समजण्यास मदत करते. 

एक्सपायरी डेट पाहावी

व्हेगन ब्युटी प्रोडक्ट खरेदी करताना एक्सपायरी डेट पाहणे खूप महत्वाचे आहे. सामान्यतः, व्हेगन ब्युटी प्रोडक्ट शेल्फ लाइफ खूपच कमी असते. कारण ते नैसर्गिक घटकांच्या मदतीने तयार केले जातात.

ब्रँडेड प्रोडक्ट

जेव्हा तुम्ही व्हेगन ब्युटी प्रोडक्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तेव्हा फक्त चांगल्या ब्रँडच्या ब्युटी प्रोडक्टचा विचार करावा. एकदा ऑनलाइन सर्च करावे. यामुळे तुम्हाला खरेदी करतांना मदत होईल.

सॅंपल प्रोडक्ट खरेदी करा

तुम्ही प्रथमच व्हेगन प्रोडक्ट खरेदी करत असाल तर प्रथम सॅंपल प्रोडक्ट खरेदी करावा. यामुळे प्रोडक्ट तुमच्या त्वचेवर कसे कार्य करत आहे आणि तुम्हाला त्यातून चांगले परिणाम मिळत आहेत की नाही हे समजण्यास मदत होईल. जर तुम्हाला प्रोडक्ट सुट झाले असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT