Year End 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Year End 2023: वर्षातील शेवटचा शनिवार; नशीब बदलायचे असेल तर करा 'हे' काम

आज वर्षातील शेवटचा शनिवार असून या दिवशी काही काम केल्याने शनिदेव प्रसन्न होऊ शकतात.

Puja Bonkile

शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे. आज 30 डिसेंबर 2023 या वर्षातील शेवटचा शनिवार आहे. जर तुमच्या कुंडलीत शनि दोष असेल तर या शनिवारी काही उपाय करून तुम्हाला आराम मिळू शकतो. आज वर्षाच्या शेवटच्या शनिवारी शुभ योग तयार होत आहे. आज शनि आणि शुक्र केंद्र योग बनवत आहेत. आज दोन्ही ग्रह एकमेकांपासून केंद्रस्थानी असतील. या शुभ योगात आज केलेले काही उपाय नशीब बदलण्यास मदत करू शकतात. 2023 च्या शेवटच्या शनिवारी तुम्ही कोणते काम करू शकता हे जाणून घेऊया.

पुढील काम नशीब बदण्यास करतील मदत

आज स्नान करून शनिदेवाची मनोभावे पुजा करावी. आज शनिदेवाला मोहरीच्या तेलाने आणि काळ्या तिळाचा अभिषेक करा. वर्षाच्या शेवटच्या शनिवारी शनी मंदिरात जा आणि त्याचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्या. यानंतर शनिदोषापासून मुक्तीसाठी प्रार्थना करा. आज तयार होत असलेल्या शुभ योगाच्या प्रभावाने शनिदेव लवकरच प्रसन्न होतील.

जर तुम्ही शनिदोष किंवा साडेसतीमुळे त्रस्त असाल तर आज तुम्हाला त्यातून मुक्ती मिळण्याची चांगली संधी आहे. वर्षाच्या शेवटच्या शनिवारी संध्याकाळी शनि मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे नशीब तुमची साथ देईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील.

आज वर्षाच्या शेवटच्या शनिवारी गरिबांची मनापासून सेवा करावी. या दिवशी काळे तीळ, कपडे, उडीद डाळ, बूट, चप्पल आणि ब्लँकेट गरजूंना दान करावे. यामुळे शनिदेव प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देतात.

मोहरीच्या तेलाने बनवलेली भाकरी आज काळ्या कुत्र्याला खायला द्यावी. शनिवारी कावळ्यांना खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते. शास्त्रानुसार असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपला आशीर्वाद देतात.

शास्त्रानुसार हनुमानजींच्या भक्तांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. आज वर्षाच्या शेवटच्या शनिवारी हनुमानजींची मनोभावे पूजा करावी. शेंदूर आणि काळी उडीद डाळ अर्पण करावे

शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आज हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण करावे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि तुम्हाला बजरंगबलीची कृपाही मिळेल.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT