Shani dev  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shani Dev : शनिवारी 'या' रंगाचे कपडे घालणे मानले जाते शुभ

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या रंगाचे कपडे घालू शकता.

Puja Bonkile

Shani Dev Tips: शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. असे म्हटले जाते की शनिदेव ज्या व्यक्तीवर प्रसन्न असतात त्या व्यक्तीच्या आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक समस्या लगेच दूर होतात.

परंतु दुसरीकडे शनिदेव जर एखाद्या व्यक्तीवर कोपले असेल तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर काय करावे हे जाणून घेऊया.

शनिवारी शनिदेवाची मनोभावे पूजा, दान आणि काही उपाय केल्याने व्यक्तीला शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते. शनिवारचा शनिदेवाच्या आवडीच्या रंगाचे कपडे घातल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा नेहमी तुमच्यावर राहते.

  • शनिदेवाचा आवडता रंग कोणता?

शनिदेवाला निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे आवडतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे घालावे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. शनिवारी तुम्ही तुमच्या पर्समध्ये निळ्या किंवा काळ्या रंगाचे कापड देखील ठेवू शकता.

शनिदेवाची नियमानुसार आणि मनोभावे पूजा केल्यास शनिदेवाची कृपा कायम तुमच्यावर राहते. तसेच सर्व दु:ख दूर होतात. शनिदेवाच्या पूजेच्या वेळी तांब्याचे भांडे वापरणे टाळावे. कारण तांबे हा सूर्याचा धातू आहे. याशिवाय शनिदेवाच्या पूजेत लाल रंगाची कोणतीही वस्तू वापरू नये. शनिवारी गरिबांना काळ्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते. शनिवारी शनिदेवाला काळे तीळ, काळे उडीद, लोखंड अर्पण करावे. 

  • शनिवारी हे रंग घालणे टाळावे

शनिवारी काळे कपडे घालणे शुभ मानले जाते. जर तुमच्याकडे काळे कपडे नसतील तर या दिवशी तुम्ही गडद काळा, गडद निळा, गडद हिरवा, जांभळा, असे गडद रंगाचे कपडे घालू शकता.

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला काळा, तपकिरी, निळा असे गडद रंग आवडतात. शनिदेवाची कृपा कायम राहण्यासाठी शनिवारी गडद रंगाचे कपडे घालावे. पण लक्षात ठेवा की या दिवशी चुकूनही लाइट रंगाचे कपडे घालू नयेत, अन्यथा घरात धनसंपत्तीत वाढ होत नाही

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

IFFI Goa 2025: इफ्फीच्या रेड कार्पेटवर धनुष-क्रिती सेनॉनचा जलवा; 'तेरे इश्क में'च्या गाला प्रीमिअरला लावली हजेरी! Watch Video

श्रीलंकेत ‘दित्वा’ चक्रीवादळाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात 47 जणांचा मृत्यू, 21 बेपत्ता; भारतालाही धोक्याचा इशारा VIDEO

Partgali Math Goa: पैंगिणीतल्या 'पर्वत कानन' स्थळी मूर्ती जड झाल्या, गायीने प्रकट होऊन जागा दाखवली; श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळ

PAK vs SL: पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! 6 चेंडूत 10 धावा जमल्या नाही, श्रीलंकेसमोर टेकले गुडघे Watch Video

SCROLL FOR NEXT