can you earn 3 lakh with 50 rupees Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Money Scam: पन्नास रुपयांची नोट द्या अन् तीन लाख कमवा

online earning viral news: बाजारात मागणी असलेली नोट तुमच्याकडे असेल तर करोडपती व्हायला वेळ लागणार नाही.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : आजकाल आंतरराष्ट्रीय बाजारात काही वेबसाइट्स आहेत, ज्या उच्च किंमतीच्या बोली लावून जुन्या नोटा आणि नाण्यांचा लिलाव करत आहेत. यामुळे लोकही रातोरात करोडपती होत आहेत. याचा फायदा तुम्हीही घेऊ शकता. जर तुम्हाला जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा शौक असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.

बाजारात मागणी असलेली नोट तुमच्याकडे असेल तर करोडपती व्हायला वेळ लागणार नाही. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 50 रुपयांच्या नोटेची मागणी झपाट्याने वाढत आहे. या नोटा खरेदीसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जर तुमच्याकडे असलेली नोट कंपनीच्या सर्व अटी पूर्ण करत असेल तर तुम्ही त्वरित 3 लाख रुपये कमवू शकता.

जर 50 च्या नोटेवर 'हा' नंबर लिहिला असेल तर 3 लाख रुपये कमवा

तुमच्याकडे असलेल्या 50 च्या नोटेवर 786 हा आकडा लिहिलेला असेल तर तुम्ही ती बाजारात 3 लाख रुपयांपर्यंत सहज विकू शकता. ही नोट ईबे वर सहज विकता येते. याद्वारे तुम्ही 3 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

दुसरीकडे, प्राचीन वस्तू जतन करणारे देखील बरेच लोक आहेत. मुस्लिम समाजात 786 हा आकडा पवित्र मानला जातो. तथापि, 786 बद्दल वेगवेगळ्या धार्मिक तज्ञांची मते भिन्न आहेत. 786 हा आकडा केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्व जाती-समुदायातील लोक भाग्यवान मानतात.

नोटा कशा विकायच्या हे जाणून घ्या

1. सर्वप्रथम, 50 रुपयांच्या नोटेसाठी तुम्ही www.ebay.com वर जावे.
2. आता मुख्यपृष्ठावर नोंदणी करा.
3. येथे तुम्ही 'विक्रेता' म्हणून स्वतःची नोंदणी करा.
4. तुमच्या नोटचा स्पष्ट फोटो घ्या आणि तो साइटवर अपलोड करा
5. त्यानंतर, जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्याची आवड असलेल्या आणि या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या लोकांना Ebay तुमची जाहिरात दाखवेल.
6. ज्याना ही नोट खरेदी करण्यात स्वारस्य असल्यास, ते तुमच्याशी संपर्क साधतील.
7. येथे तुम्ही या लोकांशी संपर्क करून तुमच्या नोटसाठी वाटाघाटी करू शकता.
8. यानंतर, योग्य किंमत मिळाल्यानंतर तुम्ही तुमची नोट विकू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT