Breast Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाबाबत गूडन्यूज, सिंगल डोस उपचारात शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश; जाणून घ्या

Breast Cancer Single-Dose Treatment: अमेरिकेतील उर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ERSO-TFPY नावाचा मोलिक्यूल डोस विकसित केला आहे. यामुळे ट्यूमर काढून टाकण्यास मदत झाली आहे.

Manish Jadhav

Breast Cancer Single-Dose Treatment: जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. भारतातही दरवर्षी या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, शास्त्रज्ञांनी सिंगल डोसने स्तनाच्या कर्करोगाचा ट्यूमर नष्ट करण्याचा दावा केला आहे. यामुळे एकाच डोसने हा आजार बरा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अमेरिकेतील उर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ERSO-TFPY नावाचा मोलिक्यूल डोस विकसित केला आहे. यामुळे ट्यूमर काढून टाकण्यास मदत झाली आहे.

ट्यूमर काढून टाकला

दरम्यान, या अभ्यासाचे नेतृत्व करणाऱ्या प्रोफेसर पॉल हर्गेनरोदर यांनी सांगितले की, स्तनाच्या कर्करोगाच्या माऊस मॉडेलमध्ये सिंगल डोसने ट्यूमर काढून टाकण्यात आला. विशेष म्हणजे, या डोसमुळे ट्यूमरचा आकार कमी करण्यास देखील मदत झाली आहे. सध्या हा रिसर्च माऊसवर (उंदीर) करण्यात आला. प्रोफेसर हर्जेनरोदर यांच्या मते, स्तनाच्या कर्करोगाच्या 70 टक्के रुग्णांना सहसा शस्त्रक्रिया करावी लागते, त्यानंतर 5 ते 10 वर्षे उपचारांसाठी वेगवेगळ्या थेरपी घ्याव्या लागतात.

समस्या उद्भवतात

दीर्घकाळ हार्मोन थेरपी घेतल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या, स्नायूंमध्ये वेदना यासारख्या समस्या उद्भवतात. ज्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अशा समस्यांमुळे 20 ते 30 टक्के रुग्ण उपचार थांबवतात. अशा परिस्थितीत, हा सिंगल डोस फायदेशीर ठरु शकतो. तथापि, यावर अधिक रिसर्च होणे आवश्यक आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, 2021 मध्ये पहिल्यांदा एक मोलिक्यूल विकसित करण्यात आला. त्याचे नाव ERSO असे ठेवण्यात आले. या सिंगल डोसमुळे स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट होऊ शकतात, परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम झाले. अशा परिस्थितीत, पुढील तीन वर्षांत त्यात काही बदल करण्यात आले आणि ERSO-TFPY नावाचा दुसरा सिंगल डोस विकसित करण्यात आला. प्रयोगशाळेत उंदरांमध्ये मानवी ट्यूमर प्रत्यारोपित करण्यात आला आणि त्यानंतर, उंदरांवर या सिंगल डोसची चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये असे आढळून आले की या डोसमुळे ट्यूमर नष्ट होतात. ERSO-TFPY च्या सिंगल डोसमुळे उंदरांमध्ये वाढणारे लहान ट्यूमर नष्ट झाले आणि मोठ्या ट्यूमरचा आकार कमी झाला.

या संशोधनातून हे स्पष्ट झाले की, या सिंगल डोसमुळे स्तनाच्या कर्करोगाचा ट्यूमर नष्ट होऊ शकतो. जर ते मानवांमध्येही यशस्वी झाले, तर स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना (Patients) या आजाराच्या उपचारांसाठी वेगवेगळ्या थेरपी आवश्यकता राहणार नाही.

भारतात दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय

2000 पासून, भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2021 मध्ये, ही संख्या सुमारे 1.25 दशलक्ष पर्यंत पोहोचली, जी भारताच्या (India) एकूण लोकसंख्येच्या सुमारे 1 टक्के आहे. देशातील विविध संस्थांमधील संशोधकांनी ARIMA मॉडेल (ऑटोरिग्रेसिव्ह इंटिग्रेटेड मूव्हिंग अॅव्हरेज) वापरुन असा अंदाज लावला की, भविष्यात भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल. 2021 ते 2023 दरम्यान, स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दरवर्षी अंदाजे 0.05 दशलक्ष वाढू शकते.

चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता 25 ते 30 वयोगटातील महिलाही या कर्करोगाच्या बळी ठरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT