Samosa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Samosa Recipe: घरीच झटपट बनवा स्वादिष्ट समोसा, नोट करा रेसिपी

सकाळी चहासोबत गरमागरम समोसे खायला मिळाले तर हे मज्जाच वेगळी असते.

Puja Bonkile

samosa recipe make tasty samosa at home

बदलत्या ऋतूत खाण्यापिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. समोसे खायला सर्वांनाच आवडतात. सकाळी किंवा संध्याकाळी चहासोबत खायला गरमागरम समोसे मिळाले तर मज्जा द्विगुणित होते. भारतात प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात तुम्हाला समोसे बनवलेले दिसतील, परंतु काहीवेळा असे घडते की लोक बाहेरचे समोसे खाणे टाळतात. तुम्हाला जर समोसे घरीच बनवायचे असेल आणि कुटुंबातील सदस्यांचे मन जिंकायचे असेल तर पुढील रेसिपी नक्की ट्राय करू शकता.

समोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मैदा

बटाटा

हिरवी मिरची

कोथिंबीर 

आल 

1 चमचा मिरची पावडर

1 टीस्पून हळद पावडर

1/2 टीस्पून गरम मसाला

छोटा चमचा हिंग

छोटा चमचा ओवा

मीठ चवीनुसार

तेल गरजेनुसार

समोसा बनवण्याची कृती

समोसा तयार करण्यासाठी सर्वात पहिले मैदा एका मोठ्या भांड्यात काढा. यानंतर या पिठात मीठ आणि ओवा घाला. नीट मिक्स केल्यानंतर त्यात पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर बाजूला ठेवा. यानंतर एक पॅन घ्या आणि त्यात तेल गरम करा.

आता त्यात उकडलेले बटाटे घालून चांगले मॅश करा. आता या बटाट्यांमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, हिंग आणि ओवा घाला. आता ते चांगले तळून घ्या. व्यवस्थित भाजल्यावर बटाटे एका प्लेटमध्ये काढून घ्या.

आता समोसे बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचा गोळा घ्या आणि त्याला गोल आकारात लाटून घ्या. आता त्याचे मधून दोन भाग करा आणि एक भाग उचला. एक भाग त्रिकोणी करा आणि त्यात बटाटे भरा.

पाण्याच्या मदतीने वरच्या भागावर चिकटवा. अशा प्रकारे सर्व समोसे तयार करा. आता हे समोसे तयार आहेत. हवे असल्यास तेलात तळून घ्या. तेलकट समोसा खायचा नसेल तर एअर फ्रायही करू शकता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT