तुम्ही अनेकदा तुमच्या चेहऱ्याचे आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचा थोडासा निष्काळजीपणा संसर्गाला बळी पाडू शकतो.
आजकाल जवळपास प्रत्येक गल्लीबोळात ब्युटी पार्लर सुरू झाले आहेत. मात्र येथील स्वच्छता तपासण्यासाठी कोणीच नाही. कात्री, कापूस, क्रिम, कपडे अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो.
या प्रत्येक वस्तू वापरानंतर स्वच्छ कराव्या लागतात, परंतु तसे न केल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पार्लर ट्रीटमेंट घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
अस्वच्छ संक्रमित वस्तूंच्या वापरामुळे संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे ब्युटी पार्लर निवडताना स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. जसे की धारदार वस्तु चांगली निर्जंतुक केलेली असावीत. पार्लरमध्ये चांगल्या कंपनीची सौंदर्य उत्पादने वापरली पाहिजेत आणि प्रत्येक ग्राहकाला स्वच्छ टॉवेल वापरायला हवा.
चांगल्या पार्लरमध्ये प्रत्येक प्रकारच्या ट्रिटमेंटसाठी स्वतंत्र विभाग असतात. वाट पाहत असताना, कोणत्याही सबबीखाली त्यांच्यात डोकावण्याचा प्रयत्न करू नका. हे चांगले वर्तन नाही.
एका दिवसात अनेक लोकांच्या ट्रिटमेंटमुळे अनेक वेळा पार्लरमध्ये काम करणारे व्यावसायिक प्रत्येक सेवेनंतर हात धुण्यास विसरतात. अशावेळी संसर्ग टाळण्यासाठी त्यांना हातमोजे वापरण्यास सांगावे.
केस कापण्यासाठी पार्लरमध्ये गेल्यास कर्मचाऱ्यांना डिस्पोजेबल फॅब्रिक वापरण्यास सांगावे. यासाठी थोडे जास्तीचे पैसे खर्च करावे लागत असतील तर जास्त विचार करू नका.
अनेक वेळा ट्रिटमेंटमध्ये काही कमतरता असेल तर त्यासाठी कर्मचाऱ्यांवर ओरडू नका. उलट त्यांची चूक सांगा. भांडणामुळे तुमचा मूडच नाही तर पार्लरचे वातावरणही खराब होईल.
खूप वेळा पार्लर बदलू नका आणि काही कारणाने पार्लर बदलावे लागले तर जुन्या पार्लरबद्दल वाईट बोलू नका.
पुढील महत्वाच्या गोष्टी ठेवाव्या लक्षात
तुम्हाला एकाच वेळी अनेक उपचार घ्यायचे असतील तर सर्वात पहिले फोनवर बोलून अपॉइंटमेंट घ्यावी आणि योग्य वेळी पार्लरमध्ये पोहोटचावे.
जास्त वेळ केल्याने तुम्हाला फारसा फरक पडणार नाही पण इतर ग्राहक नक्कीच त्यामुळे नाराज होऊ शकतात.
ब्युटी ट्रिटमेंट घेताना फोनवर बोलणे टाळावे. त्याऐवजी सायलेंट मोडवर ठेवावे. फक्त महत्वाचे कॉल उचलावे.
पार्लरमध्ये लहान मुलांना कधीही सोबत नेऊ नका. यामुळे पार्लरच्या कर्मचाऱ्यांना त्रास तर होईलच शिवाय काही दुर्घटना घडण्याचाही धोका असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.