Heart Care| Running Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Research: महिलांसाठी धावणे फायदेशीर पण पुरुषांसाठी ठरू शकते घातक...

Heart Care: पुरुषांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका अधिक असतो.

दैनिक गोमन्तक

सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणे होत नाही. तसे हृदयविकार अनेक कारणांमुळे होऊ शकतो. ज्यामध्ये अनुवांशिक, खराब जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि अति शारीरिक आणि मानसिक ताण यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 2021 मध्ये प्रसिद्ध झालेल्या WHO अहवालात असे दिसून आले आहे की जगभरात दरवर्षी 17.9 दशलक्ष लोक हृदयविकाराने मरण पावतात.

बार्थोलोम्यू हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) येथील बार्ट्स हार्ट सेंटरने केलेल्या अलीकडील संशोधन अभ्यासात धावणे आणि हृदयविकाराचा झटका यातील संबंध आढळून आला. या धक्कादायक अभ्यासात (Research) असे म्हटले आहे की धावणे हे महिला आणि पुरुषांसाठी सारखेच फायदेशीर नाही. धावणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

या अभ्यासानुसार लांब पल्ल्याची धावणे पुरुषांसाठी घातक ठरू शकते. यामुळे पुरुषांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका जास्त असतो. तर महिलांसाठी धावणे अधिक फायदेशीर आहे. पुरुषांच्या बाबतीत, त्यांच्या प्रमुख धमन्या अपेक्षेपेक्षा कठीण होत्या, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि पक्षाघाताचा धोका जास्त असतो, असे अहवालात म्हटले आहे.

असे आढळून आले की मॅरेथॉन, आयर्नमॅन ट्रायथलॉन आणि सायकलिंग इव्हेंटमध्ये नियमितपणे सहभागी झालेल्या पुरुषांचे रक्तवहिन्याचे वय त्यांच्या वयापेक्षा 10 वर्षे मोठे होते. तर धावण्याने (Running) स्त्रियांचे (Women) वय सरासरी 6 वर्षांनी कमी होते. अभ्यासाचे निष्कर्ष 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या धावपटूंवर आधारित आहेत. अभ्यासात 300 हून अधिक धावपटूंनी भाग घेतला. या लोकांनी 10 पेक्षा जास्त सहनशक्ती कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता आणि किमान 10 वर्षे नियमितपणे व्यायाम केला होता.

धावणे आरोग्यदायी

तज्ञांचे असे मत आहे की धावणे आरोग्यदायी असते. सर्वात सोपा व्यायामांपैकी एक म्हणजे धावणे. प्रभावीपणे धावण्यासाठी, प्रत्येकासाठी योग्य पोशाख आणि पादत्राणे आवश्यक आहेत. महिलांनी (Women) स्पोर्ट्स ब्रा घालाव्यात. सुरुवातीला लांब पल्ल्याच्या धावायला जाऊ नका. वेग कधी घ्यायचा आणि कधी कमी करायचा हे जाणून घ्या. धावताना ताबडतोब थांबू नका, थांबेपर्यंत हळू चालत रहा.

जास्त धावू नका

जास्त धावल्याने शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ञांच्या मते, जास्त धावल्यामुळे प्लांटर फॅसिटायटिस होऊ शकतो. टाचांमध्ये तीव्र वेदना होउ शकतात. जास्त व्यायामामुळे रोगप्रतिकारक (Immunity) शक्ती कमकुवत होऊ शकते आणि एखाद्या व्यक्तीला संक्रमण होण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम व्यक्तीच्या भूकेवरही होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT