Rock Salt Water Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rock Salt Water: त्वचाविकार, हाडांच दुखणं 'या' 6 समस्यांवर गुणकारी आहे सैंधव मिठाचे पाणी

,बॉडी डिट्रॉक्स करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन करणे करणे फायदेशीर ठरू शकते.

Puja Bonkile

Rock Salt Water: मीठ खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक आणि हार्ट अॅटकचा धोका वाढतो. मीठाचे सेवन नेहमी मर्यादित करावे असा सल्ला आरोग्य तज्ञ देतात. जास्त मीठ खाणाऱ्यांना अनेक आजारांचा सामोरे जावे लागते. पण सैंधव मीठ हे नैसर्गिक आहे. हे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. त्याला रॉक सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्ट असेही म्हणतात. सैंधव मीठाचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अनेक समस्या कमी होतात.

  • पचनसंस्था सुरळित कार्य करते

सैंधव मीठ पोटाशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी सैंधव मीठाचे पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल वाढते, जे अन्न पचन आणि शोषण्यास मदत करते. यामुळे अपचन, पोट फुगणे, गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्या कमी करते.

  • वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

सैंधव मीठाचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढते. यामुळे पोट साफ राहते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

  • बॉडी डिटॉक्स

सैंधव मिठ शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुरळित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील घाण बाहेर काढून अनेक आजारांना दूर ठेवते.

  • इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या मते, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह सारखी 84 खनिजे सैंधव मिठात असतात. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात. उन्हाळ्यात शरीरात इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे सतत थकवा, अशक्तपणा यासारख्या समस्या जाणवतात.

  • मजबूत हाडे

सैंधव मिठांमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहून मजबुत राहतात.

  • निरोगी आणि चमकदार त्वचा

सैंधव मिठांमध्ये चमकदार त्वचेसाठी फायदेशीर घटक असतात. यामुळे तुम्ही सैंधव मिठाचे पाणी आठवड्यातून एकदा सेवन करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Baina Fish Market: "बायणा मासे मार्केटात जाणार नाही"! विक्रेत्यांचा ठाम पवित्रा; मुरगाव पालिकेचा निर्णय अडचणीत

Goa Municipal: म्हापशातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर 1 जूनपर्यंत तोडगा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

One-year of Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'ला 1 वर्ष पूर्ण: पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांनी बदलला सोशल मीडिया डीपी!

Goa Worker Layoffs: तोडगा निघेना, संघर्ष वाढला! सेसा कामगारांचे बेमुदत आंदोलन कायम, कंपनीने तोडग्याची तयारी फेटाळली

Goa Crime: आईच्या खूनप्रकरणात चार वर्षांनंतर मोठा दिलासा! ठोस पुराव्याअभावी खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT