White Rice'
White Rice' Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तुम्हीही 'White Rice' खाणे आरोग्यासाठी हानिकारक समजता? मग 'हे' 5 फायदे जाणून घ्या

Puja Bonkile

White Rice Health Benefits: अनेक भारतीय घरांमध्ये भाताशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये भात नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा भाग आहे. 

पांढऱ्या भाताबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या समजुती असल्या तरी पांढरा भात आरोग्याला हानी पोहोचवण्याचे काम करतो आणि शरीराला कोणताही फायदा देत नाही असे अनेकांचे मत आहे. 

या समजुतींमुळे अनेक लोक भाताला हात लावणेही सोडून देतात. पण तुम्हाला माहित आहे का की पांढरा भात खाण्याचे आरोग्यादायी फायदे देखील आहेत.

पांढऱ्या भातामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉलिक अॅसिड यांसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे रक्तदाब आणि हृदयविकारासाठी फायदेशीर आहेत. त्यात फॅट आणि सोडियमची उपस्थिती देखील आढळते.

पांढरा भात हे परिष्कृत कार्बोहायड्रेट असल्याने त्यात फायबरसह काही आवश्यक पोषक तत्वांचा नक्कीच अभाव असतो. पण जर तुम्ही याचे सेवन पौष्टिक भाज्यांसोबत केले तर ते तुम्हाला अनेक फायदे देऊ शकतात. चला जाणून घेऊया पांढरा भात खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात.

1. एनर्जी बूस्टर

पांढरा भात खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. कारण त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते आणि कार्बोहायड्रेट शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. 

2. ग्लूटेन मुक्त

पांढरा तांदूळ ग्लूटेन मुक्त अन्न आहे. म्हणूनच ज्यांना ग्लूटेन ऍलर्जीची समस्या आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. 

3. पचनसंस्था सुरळित कार्य करते

पांढरा भात खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळण्यासही हे उपयुक्त आहे. हे खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.   

4. रक्तदाब

रक्तदाबाच्या रुग्णांसाठी पांढर्‍या तांदळाचे सेवन फायदेशीर मानले जाते. हे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.        

5. अँटिऑक्सिडंट्स भरपूर

पांढऱ्या तांदळात अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.


(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT