Stomach Health
Stomach Health Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Stomach Health: या आसनाद्वारे पोटाच्या समस्या दूर करा

दैनिक गोमन्तक

Stomach Health: सध्या धावपळीच्या युगात आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या सवयी , व्यायाम , व्यवस्थित झोप हे आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी महत्वाचे ठरते. आपल्या निरोगी आरोग्यासाठी योगासने करणे केव्हाही फायदेशीर ठरते.

पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि स्नायूंचे ताकद वाढवण्यासाठी एक आसन आहे त्याबद्दल आज जाणून घेऊयात. उत्तानपादासन असे या आसनाचे नाव असून याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहे. हे पाठीवर झोपून करण्याचे आसन आहे आणि करण्यासही अगदी सोपे आहे.

उत्तानपादासन केल्यानंतर पोटावर उत्तम दाब येतो. त्यामुळे पोटातील इंद्रीये अधिक कार्यक्षम होऊन त्यांचे कार्य सुधारते, त्यांची ताकद वाढते.

पोटाच्या छोट्या-मोठ्या तक्रारी दूर होतात. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता, वात यांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

मांडीचे स्नायूसुद्धा अधिक सुदृढ होतात. कंबरेची ताकद वाढते. याबरोबर पायदुखी, गुडघेदुखी ,टाचदुखी, व्हेरिकोज व्हेन्स हे त्रास कमी होण्याससुद्धा मदत होते. मासिक पाळीच्या दिवसात किंवा गरोदरपणात, पोटाचे काही तीव्र त्रास असतील तर आसन करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

Dhargal Fatal Accident: धारगळ अपघात प्रकरणात अखेर खूनाचा गुन्हा दाखल

Sanguem News : सांगेत मुख्य रस्त्यावरील गटारांची सफाई गरजेची

United Nations: गाझामधील युद्ध थांबवले नाही तर... संयुक्त राष्ट्रात भारताने इस्रायल आणि हमासला सुनावले

Goa Today's Live News: पणजी महानगरपालिका कर कपात करणार - महापौर रोहित मोन्सेरात

SCROLL FOR NEXT