Relief from Knee Pain
Relief from Knee Pain Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relief from Knee Pain: 'हे' तेल देईल गुडघे दुखीपासून सुटका

दैनिक गोमन्तक

Relief from Knee Pain: म्हातारपणी अनेकदा गुडघेदुखीने त्रस्त लोकांना तुम्ही पाहिलं असेल, पण आजकाल मोठ्यांना तर गुडघेदुखीचा त्रास होतोच मात्र आपल्याला आजूबाजूला असणाऱ्या लहानांना देखील गुडघेदुखीचा त्रास होऊ लागल्याचे आपण अनेकदा पाहतो.

यामुळे त्यांना चालणंही कठीण झालं आहे. मात्र या गुडघेदुखीवर उपलब्ध असलेले घरगुती उपाय तुम्हाला माहीत आहे का? आज आपण हे उपाय कोणते आणि त्याचा वापर कसा करावा याविषयी जाणून घेणार आहोत.

  • मोहरीचे तेल

मोहरीचे तेल गुडघेदुखी कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे. यासाठी मोहरीच्या तेलात लसणाच्या दोन ते चार पाकळ्या कुस्करून चांगल्या गरम कराव्यात.

तेल थोडे कोमट राहिल्यावर गुडघ्यांना मसाज करा. मोहरीच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्ससारखे गुणधर्म असतात, ज्यामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

  • हीट थेरेपी

काही वेळा रक्ताभिसरण नीट होत नसल्याने गुडघेदुखी किंवा सूज जाणवण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे रक्ताभिसर नीट होण्यासाठी आणि गुडघ्याभोवतीच्या स्नायूंना आराम देण्यासाठी हीट थेरपी देखील वापरू शकता. तुम्ही हीटिंग पॅड लावू शकता किंवा कोमट पाण्याने आंघोळ करु शकता.

  • व्यायाम करा

गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत करण्यासाठी हलका व्यायाम करा. यामध्ये पोहणे, सायकलिंग किंवा स्ट्रेचिंग यांसारख्या व्यायामांचा समावेश असू शकतो.

  • आइस पॅक

दर 2-3 तासांनी सुमारे 15-20 मिनिटे गुडघ्यावर बर्फाचा पॅक लावल्याने गुडघेदुखी थांबण्यास मदत होऊ शकते. थंड तापमानामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

  • असा असावा आहार

शऱीरातील सूज कमी करण्यारे गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा. यामध्ये फळे, भाज्या, सॅल्मन सारखे फॅटी मासे आणि ड्राय फ्रूटचा समावेश असू शकतो. याबरोबरच प्रोसेस्ड पदार्थ, साखर असलेले स्नॅक्स आणि दारु सारखे शरीरात जळजळ निर्माण करणारे पदार्थ खाण्याचे टाळावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT