Fasting Special Dish: श्रावणातील उपवासामध्ये 'हा' पदार्थ भागवेल भूक

Fasting Special Dish: फायबरने समृद्ध असल्याने पोटही भरते
Sweet Fasting Dish
Sweet Fasting DishDainik Gomantak
Published on
Updated on

Fasting Special Dish: अधिक श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण म्हटलं की उपवास हा आलाच. आपल्याकडे उपवासालादेखील विविध चवदार पदार्थांची रेलचेल असते. मात्र अनेकदा आपल्यापैकी अनेकजण उपवासाचे तेच-तेच ठरलेले पदार्थ खाऊन कंटाळलेले असतात.

महत्वाचे म्हणजे श्रावणातले उपवास बाकीच्या उपवासांपेक्षा वेगळे असतात. प्रत्येक भागातील रुढी-परंपरानुसार ते केले जातात. त्यामुळे साहजिकच उपवासाला काय खावे काय खाऊ नये हे त्या-त्या प्रदेशानुसार बदलत जाते.

उपवासासाठी नवीन एखादा पदार्थ ट्राय नक्की केला जातो. आज आपण असाच एक रुचकर पदार्थ कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत. हा पदार्थ म्हणजे सिंघाड्याचा शिरा.

सिंघाडा चविष्ठ तर असतोच मात्र हा सिंघाडा फायबरने समृद्ध असल्याने पोटही भरते आणि लवकर भूकही लागत नाही. त्यामुळे उपवासासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या सिंघाड्याचा शिरा कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत.

Sweet Fasting Dish
Turmeric Hair Spray: पांढऱ्या केस काळे करण्यासाठी असा करा 'हळदी'चा उपयोग

साहित्य

1. साखर 1 कप

2. 1 कप सिंघाड्याचे पीठ

3. शुद्ध तूप ३/४ कप

4. दूध २ वाट्या

5.हिरवी वेलची पावडर १/२ टीस्पून

6. 7-8 बदाम बारीक चिरलेले बदाम

असा बनवा सिंघाडाच्या पीठाचा शीरा

सिंघाड्याच्या पीठाचा शीरा बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तूप गरम करा. नंतर त्यात सिंघाड्याचे पीठ पाणी घालून मंद आचेवर थोडे सोनेरी होईपर्यंत चांगले भाजून घ्या. त्यात एक कप गरम दूध घालून ढवळत राहा

या मिश्रणामध्ये आता साखर घालून मंद आचेवर ठेवा यानंतर हे मिश्रण सतत ढवळत राहा, तूप वेगळे होईपर्यंत चांगले शिजवा. नंतर त्यात वेलची पूड आणि बारीक चिरलेले बदाम घाला. यानंतर नीट मिक्स करून गॅस बंद करा. तुमच्या श्रावणातील उपवासासाठी हा सिंघाड्याचा शिरा तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com