Reliance  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Netflix, Amazon Prime आणि JioCinema चा घ्या महिनाभर मोफत आनंद , जीओची खास ऑफर

भारतातील सुप्रसिद्ध दूरसंचार कंपनी जिओ आपल्या युजर्सला नवनव्या ऑफरची अपडेट देत असते.

Puja Bonkile

Jio: भारतातील सुप्रसिद्ध दूरसंचार कंपनी जिओ आपल्या युजर्सला नवनव्या ऑफरची अपडेट देत असते. अलीकडेच, कंपनीने आपल्या मोबाइल सेवा सुधारण्यासाठी Jio Plus च्या पोस्टपेड सेवा दिल्या आहेत.

आता दूरसंचार सेवा प्रदाता Jio दोन पोस्टपेड प्लॅनवर 30 दिवसांची मोफत चाचणी देत ​​आहे. यामध्ये 399 आणि 699 रुपयांच्या प्लॅनचा देण्यात आला आहे. TelecomTalk अहवालानुसार, दोन्ही प्लॅन नुकतेच सादर केले गेले आहेत आणि युजर्स आता या दोन पोस्टपेड प्लॅनची निवड करून 30 दिवसांची विनामूल्य चाचणी घेऊ शकतात.

जिओ प्लस पोस्टपेड प्लॅन

हा फॅमेली प्लॅन आहे. लोकांसाठी नवीन पोस्टपेड प्लॅन वापरून पाहण्यासाठी आणि अधिक ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ही विनामूल्य ऑफर वापरण्यात आली आहे. हा प्लॅन कसा खास आहे हे पाहुया.

  • फ्रि ट्रायलचा कसा लाभ कसा घ्यावा

फ्रि ट्रायल पूर्णपणे विनामूल्य असेल आणि या कालावधीत ग्राहकांना पैसे मोजावे लागणार नाही. युजर्सला फक्त नवीन कनेक्शन घेणे आवश्यक आहे किंवा इतर पोस्टपेड प्लॅनमधून या दोन पोस्टपेड प्लॅनवर स्विच करणे आवश्यक आहे. म्हणजेच, 30 दिवसांच्या फ्रि ट्रायल ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्स प्रीपेडवरून पोस्टपेडवर देखील स्विच करू शकतात.

  • रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

जिओचा हा प्लॅन 399 रुपयांच्या किंमतीत येतो आणि यात 75GB डेटा मिळतो. यामध्ये तुम्ही 99 रुपये प्रति कनेक्शन देऊन 3 अतिरिक्त कनेक्शन घेऊ शकता आणि प्रत्येक कनेक्शनला दरमहा 5GB डेटा मिळतो.

सर्व कनेक्शनसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल्ससह दररोज 100 SMS समाविष्ट आहेत. या प्लॅन अंतर्गत युजर्स Jio च्या अमर्यादित 5G डेटा ऑफरचा लाभ घेऊ शकतात . इतर फायद्यांमध्ये JioCinema, JioCloud, JioTV इ.समावेश आहे.

  • रिलायन्स जिओचा 699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

या प्लॅनमध्ये 100GB डेटा प्रति महिना आणि 3 जास्तीचे सिम 99 रुपये प्रति सिम आहे. याशिवाय, प्रत्येक सिमवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMSसह 5GB डेटा मिळतो. हा प्लॅन Jio वेलकम ऑफरसाठी देखील पात्र आहे, जिथे युजर्सला अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. या व्यतिरिक्त नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउडचे सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT