Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship: सोशल मिडियावर करू नका 'या' चुका, नात्यात येईल दुरावा...

तुम्हीही सोशल मिडियावर या चुका करत असाल तर नात्यात दुरावा येऊ शकते.

Puja Bonkile

Relationship: कोणतही नातं टिकुन राहण्यासाठी त्यात विश्वास आणि प्रेम असणे गरजेचे असते. पण सोशल मीडियाच्या या युगात नातं टिकवणे खूप अवघड आहे. काही चुकांमुळे, त्याचा तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो. 

अशा कोणत्या चुका आहेत ज्या सोशल मीडियावर केल्यास तुमच्‍या नात्यात काही ना काही नकारात्मक बदल दिसून येतात. या चुकांकडे लक्ष देऊन तुम्ही त्या दुरुस्त करू शकता. चला जाणून घेऊया या चुका कोणत्या आहेत.  

  • ओव्हर शेअरिंग

तुमच्या जोडीदाराच्या परवानगीशिवाय तुमच्या नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्याविषयीच्या गोष्टी सोशल मीडियावर सतत शेअर करू नका. कारण यामुळे तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हे सर्व सोशल मीडियावर शेअर करायला आवडत असेल पण समोरच्या व्यक्तीलाही आवडेल असे नाही. यामुळे मर्यादेत राहून सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करावे.

  • संवादाचा अभाव

बरेच लोक त्यांच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यापेक्षा सोशल मीडियावर किंवा फोनवर जास्त वेळ घालवतात. यामुळे नात्यात हळूहळू अंतर येऊ लागते. सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जास्त वेळ घालवायला हवा. यासाठी तुम्ही जोडीदाराला स्वंयपाक करण्यात मदत किंवा बाहेर फिरायला जाऊ शकता. यामुळे एकमेकांसोबत संवाद साधता येईल.

  • फ्लर्टिंग 

सोशल मीडियावर इतरांसोबत फ्लर्ट करणे आणि दुसऱ्याच्या पोस्टमध्ये इंटरेस्ट दाखवणे याचा तुमच्या नात्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावरील विश्वास उडू शकतो. यामुळे तुमचं नातं टिकवुन ठेवण्यासाठी अशा चुका करू नका.

  • सोशल मिडियावर वाद

सोशल मीडियावर तुमचे परस्पर विवाद सर्वांसमोर आणणे तुमच्या नात्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. यातूनच तुमच्यातील वादाचा तिसरा कोणी फायदा घेऊ शकतो. यामुळे परस्पर वाद आपसातच सोडवावे.

  • तुलना करणे

सोशल मीडियावर कपल्सला पाहणे आणि त्यांच्याशी आपल्या नातेसंबंधाची तुलना करणे हे चुकीचे आहे.  अनेक वेळा सोशल मीडियावर आपण जे काही पाहतो त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो.यामुळे तुम्ही आय़ुष्यात समाधानी असले पाहिजे आणु इतरांशी तुलना करणे टाळले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sandpapergate Scandal: 'उस्मान ख्वाजा सर्वात मोठा गद्दार', सँडपेपरगेट प्रकरणावरुन डिव्हिलियर्सचा संताप; क्रिकेटची बदनामी केल्याचा आरोप

Goa Spice Cultivation: जायफळ, वेलची, काळी मिरीला बाजारात मागणी; गोव्यात मसाला पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Accident News: दोन महिन्यांपूर्वी घेतली कार, 100च्या स्पीडमध्ये 20 फूट हवेत उडून झाडावर आदळली… भीषण अपघातात 7 तरुणांचा मृत्यू

Mohammed Siraj Selection: मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मधून वगळण्यावरुन राजकीय वादंग! काँग्रेस नेत्याने तोडले तारे; म्हणाले, 'नावामुळे भेदभाव...' VIDEO

Under 16 Cricket: गोव्याचा पहिला डाव 97 धावांत आटोपला; कर्नाटकने पहिल्याच दिवशी 127 धावांची आघाडी घेत वर्चस्व गाजवले

SCROLL FOR NEXT