Relationship  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: नात्यात शंका येत असेल तर 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Relationship Tips: जेव्हा नात्यात शंका निर्माण होऊ लागते तेव्हा पुढील गोष्टी करण्यास सुरूवात करावी यामुळे नात्यात कधीच दुरावा येणार नाही.

Puja Bonkile

Relationship Tips these easy ways remove problem of doubt in relationship

कोणतही नातं टिकून राहण्यासाठी विश्वास आणि प्रेम असणे गरजेचे असते. नात्यात शंका येत असेल तर असे नात तुटण्यास जास्त दिवस लागत नाही. शंकेमुळे लोक आपले अनेक संबंध खराब करतात. नातेसंबंधांमध्ये संवादाचा अभाव असल्याने असे अशा समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

मनातील गोष्ट बोलावे

नातं घट्ट ठेवण्यासाठी नात्यात प्रेम असणं खूप गरजेचं आहे. जर शंका तुमच्या नात्यातील प्रेमाची जागा घेत असेल तर ती एक समस्या आहे. यामुळे नात्यात येणारा दूरावा कमी करण्यासाठी स्वतःला समजावून सांगा की तुमच्या जोडीदारावर शंका घेणे ही योग्य गोष्ट नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय तुमच्या जोडीदारावर संशय घेणे टाळावे. तुमच्या मनात शंका असेल तर त्याबाबत जोडीदाराशी बोलावे.

स्पेशल फिल करून द्यावे

तुमचं नातं मजबूत ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराला खात्री द्या की तुम्ही त्यांचे चांगले मित्र आहात आणि तुमचीही तशीच अपेक्षा आहे. तुम्ही त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा, त्यांच्यासोबत जेवण बनवा किंवा चित्रपट पाहायला जा. तुमच्या जोडीदाराला सांगा की ते तुमच्यासाठी किती खास आहेत. जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असता तेव्हा त्यांचे कौतुक करा.

स्पष्ट बोलावे

जर तुमच्या जोडीदाराबद्दल दुसरे कोणी काही बोलत असेल तर जरूर ऐका पण लगेच शंका घेऊ नका. कोणताही पुरावा सापडला नाही तर तुमच्या जोडीदारावर विनाकारण संशय घेऊ नका. तुमच्या समाधानासाठी तुम्ही एका जागी बसून जोडीदाराशी स्पष्टपणे बोलावे.

जोडीदार व्यस्त असेल तर समजून घ्या

नातं कोणतेही असो, प्रत्येक नात्याला वेळेची गरज असते. जर तुमचा पार्टनर तुम्हाला दररोज वेळ देऊ शकत नसेल तर याचा अर्थ तो तुमची फसवणूक करत आहे असे नाही. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.

जोडीदाराच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

जोडीदाराच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कारण असे केल्याने शंका निर्माण होऊ शकते. तुमचा पार्टनर काय म्हणतो काळजीपूर्वक ऐकावे. जोडीदाराला काय हवे काय नको हे समजून घ्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT