Happy Married Couple Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Happy Married Couple: नातेवाईकांमुळे होतायत वैवाहिक जीवनात वाद? सुखी संसारासाठी फॉलो करा 'या' टिप्स

अनेकवेळा नातेवाईंकामुळे पती-पत्नीच्या नात्यामध्ये कटूता निर्माण होते. अशावेळी काय करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Relationship Tips For Happy Married Couple: कोणतंही नातं टिकवून ठेवणं अवघड आहे. नातं टिकवून ठेवण्यासाठी दोघांनाही प्रयत्न करणे गरजेचे असते. एकमेकांना पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय नातं यशस्वी होऊ शकत नाही. नात्यात भांडणे होणे अगदी सामान्य गोष्ट आहे.

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की जिथे प्रेम असते तिथे भांडणंही होतात. काही लोक असेही मानतात की नात्यात भांडणे आवश्यक असतात, कारण यामुळे नात्यात प्रेम वाढतं.

एकीकडे छोट्या छोट्या भांडणांमुळे नातं सुंदर होतं, दुसरीकडे भांडण वाढलं तर त्याचा परिणाम नात्यावर होतो. आपसातील वाद सहज मिटतात, परंतु काही वेळा कुटुंबातील सदस्यांमुळे आणि नातेवाईकांमुळे पती-पत्नीमध्ये दररोज भांडणे होतात.

अनेकवेळा स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी दोघेही भांडतात. अनेकवेळा अशा कौटुंबिक भांडणांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. तसेच नातं तुटू देखील शकते. अशावेळी पती-पत्नी दोघांनीही आपलं नातं सुधारण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

आपले विचार आणि मत स्पष्ट मांडा

कौटुंबिक कारणामुळे दोघांच्या नात्यात कटूता निर्माण होत असेल तर घरातील सदस्यांसमोर आपले मत स्पष्ट मांडावे आणि उपाय काढावे. सर्व समस्या संवाद साधून नीट करू शकता. घरच्यांकडून काही चुका होत असतील तर त्या सांगण्यास अजिबात संकोच करू नका. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांगत नाही की त्यांच्यामुळे तुम्हाला समस्या येत आहेत, तोपर्यंत त्या गोष्टी सुधारणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यात अजिबात संकोच करू नका.

अर्धवट गोष्टी सांगू नका

जेव्हा तुम्ही एकमेकांशी कोणत्याही विषयावर बोलता तेव्हा गोष्टी उघड आणि स्पष्ट ठेवा आणि तुमच्या पार्टनरला नेहमी सर्व काही सांगा. जेणेकरून त्याला हे प्रकरण पूर्णपणे समजेल आणि त्यानुसार उपाय निघतील. लहान आणि अर्धवट माहिती नात्यात कटूता आणू शकते.

एकमेकांशी संवाद साधावा

एकमेकांशी शांतपणे बोलून कोणतीही समस्या सुट शकते. जर तुम्हाला तुमचं नातं टिकवायचे असेल तर भांडण करण्याएवजी एकमेकांशी बोलून समस्यांवर उपाय काढावे.

भांडणाचे कारण समजून घ्या

पती-पत्नीच्या नात्यात घरातील सदस्यांमुळे किंवा नातेवाईंकामुळे कोणत्याही विषयावरून भांडण होत असेल, तर भांडणाचे मूळ कारण काय ते समजून घ्यावे. कारण यामुळे तुमच्याच नात्यात कटूता येऊ शकते. त्याच्यामुळे तुमच्यामधील प्रेम कमी होऊ देऊ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT