Relationship Problems Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: नात्यात आलेली कटूता दूर करण्यासाठी काय करावे?

नात्यातील कटुता कमी करण्यासाठी पुढील उपाय केल्यास कपल्समध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल.

Puja Bonkile

relationship tips do these things for relationship issues

अनेकवेळा छोट्या- मोठ्या कारणांमुळे नात्यात कटुता येते. यामुळे दुरावा निर्माण होण्यास वेळ लागत नाही. अनेकवेळ लोक त्याच्या बिझी लाइफस्टाइलमुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. खरं तर नातं टिकून ठेवण्यासाठी दोघांनाही प्रयत्न करणे गरजेचे असते. यामुळे नात्यातील दूरावा कमी करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

एकमेकांना सरप्राइज द्या


नातं मजबूत ठेवण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर करणं गरजेचं आहे. पती-पत्नी एकमेकांना गिफ्ट देऊन त्यांचं नातं घट्ट करू शकतात. गिफ्ट किंवा सरप्राईज गिफ्ट दिल्याने नात्यातील दुरावा आणि कटुता कमी होण्यास मदत मिळते.


जोडीदाराला वेळ द्या

एकमेकांना क्वॉलिटी टाइम न दिल्याने फक्त जोडपेच नाही तर आजकाल प्रत्येकाच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. लोक आयुष्यात इतके व्यस्त असतात की ते एकमेकांना योग्य वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे नात्यात कटुता येऊ शकते. नात्यातील दुरावा दूर करण्यासाठी एकमेकांना वेळ देणे खूप गरजेचे आहे. यासाठी एकत्र बाहेर जावे किंवा घरात एकमेकांना कामात मदत देखील करू शकता.

संवाद साधावा


भांडण झाले की लोक अबोला धरतात. पण संवाद न साधणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. याउलट कोणतीही समस्या स्पष्ट बोलून सोडवावी. भांडणामुळे बोलणे थांबले असेल तर स्वत: पुढाकार घेऊन बोलावे.

अहंकार बाजूला ठेवा


नात्यात कोणत्याही प्रकारच्या अहंकाराला स्थान देऊ नका. अहंकारामुळे नाती कमकुवत होतात. अहंकारामुळे नातं तुटू शकते. यामुळे आधी अहंकार बाजूला ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा चुका होतात तेव्हा लोक एकमेकांशी बोलणे टाळतात. जर नात्यात अंहकार नसेल तर सुखी आयुष्य जगण्यास मदत होइल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

SCROLL FOR NEXT