Red Potato Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Red Potato Benefits: लाल बटाट्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Red Potato Benefits: साखर आणि तंतुमय पदार्थाचे प्रमाण, व्हिटॅमीनचे प्रमाण, सूक्ष्मव्हिटॅमीन लाल बटाट्यामध्ये समसमान प्रमाणात आढळते.

दैनिक गोमन्तक

Red Potato Benefits: आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या स्वयंपाकघरात बटाटा हमखास आढळतो. कोणत्याही भाजीत सहज मिसळून पदार्थाची चव वाढवणारा बटाटा अनेकांना आवडतो. महत्वाचे म्हणजे बटाट्याचे अनेक चविष्ट पदार्थदेखील बनवता येतात आणि त्याची चवही चाखता येते. बहुतेकजण पांढरा बटाट्याचा वापर करताना दिसतात. मात्र तुम्हाला लाल बटाट्याविषयी माहिती आहे का?

चला तर जाणून घेऊयात लाल बटाट्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत. साखर आणि तंतुमय पदार्थाचे प्रमाण, व्हिटॅमीनचे प्रमाण, सूक्ष्मव्हिटॅमीन लाल बटाट्यामध्ये समसमान प्रमाणात आढळते. तज्ञांच्या म्हणणण्यानुसार बटाट्याचा हा प्रकार सर्वात आरोग्यदायी असतो.

1. कमी कॅलरीज असतात.

2. ब्लडप्रेशरचे व्यवस्थित रेग्यूलेशन होते. शरिरातील ब्लडप्रेशर सुरळित चालण्यासाठी लाल बटाटा सगळ्यात महत्वाचे काम करतो.

3. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जास्त असतात.

4. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.

5. हा बटाटा नैसर्गिकरित्या ग्लूटेनफ्री असतो.

6. आपला थकवा, ताणतणाव कमी करण्याची किमया या लाल बटाट्यामध्ये असते.

7. शरिरातील उत्साह वाढण्यास मदत होते.

8. रोगप्रतिकारशक्ती वाढते.

9. हा लाल बटाटा नैसर्गिकरित्या फॅटफ्री असतो.

10. महत्वाचे म्हणजे मध्यम आकाराचा बटाटा खाल्ल्यास तुमचे पोट भरते.

11. बटाट्याची जी लाल साल असते त्यामध्ये लोह, पोटॅशिअम, व्हिटॅमीन B12, फायबर आढळते.

लाल बटाटा भाजून खाण्यासाठी, सूपमध्ये तसेच सलादमध्ये वापरला जातो. याबरोबरच लाल बटाटा हा सगळ्यात पौष्टिक मानला जातो. त्यामुळे याचे आपल्या रोजच्या आहारात समावेश केला तर त्याचा आपल्या शरिरासाठी फायदे दिसून येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT