Raksha Bandhan 2023: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2023: माता लक्ष्मीच्या कृपेसाठी भावा-बहिणीने रक्षाबंधनाला करावे 'हे' उपाय

रक्षाबंधनला भावा-बहिणीने ज्योतीषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास शुभ मानले जाते.

दैनिक गोमन्तक

Raksha Bandhan 2023: भावा-बहिणींचा म्हणून ओळखला जाणारा सण रक्षाबंधन यंदा 30 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी भावांच्या मनगटावर राखी बांधतात. ज्योतिषशास्त्रात रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे यासाठी काही खास उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने जीवनात मान-सन्मान वाढतो.

  • माता लक्ष्मीची कृपा

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आणि बहिणी पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात आणि एकत्र देवी लक्ष्मीची पूजा करतात. यासोबत केशराची खीर अर्पण करावी. यानंतर माता लक्ष्मीसमोर बहिणी आणि भावांना राखी बांधून कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. त्यानंतर आठ मुलींना बोलावून खीर प्रसादाचे वाटप करा आणि लाल चुनरीसह दान करावे. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.

  • मिळेल शुभ परिणाम


ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन हा सण पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो आणि पौर्णिमा देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांच्याशी संबंधित आहे. या दिवशी भाऊ आणि बहिण भगवान शिव आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. संध्याकाळी दूध आणि अक्षत पाण्यात मिक्स करून चंद्राला अर्घ्य देतात. असे केल्याने ग्रहांचे शुभ प्रभाव मिळतो आणि जीवनात प्रगती होते.

  • गरिबी दूर होते

गरिबी दूर करण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या हातातून गुलाबी कपड्यात तांदूळ, एक रुपया आणि एक सुपारी बांधावी. यानंतर बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि नंतर भाऊ बहिणीला गिफ्ट देतो. त्यानंतर गुलाबी कपड्यात ठेवलेल्या वस्तू उत्तर दिशेला ठेवाव्यात. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

  • तुरटी

बहिण भावाला राखी बांधते तेव्हा पूजेच्या ताटात तुरटी ठेवतात. राखी बांधल्यानंतर भावाच्या डोक्यापासून पायापर्यंत विरुद्ध दिशेने तुरटीचा सात वेळा फिरवावी आणि चौरस्त्याच्या किंवा चुलीच्या आगीत टाकावे, असे केल्याने वाईट शक्ती दूर राहते. सभोवताली सकारात्मक ऊर्जा वास करते. असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे.

  • धान्यमध्ये होईल वाढ

रक्षाबंधनाच्या दिवशी लाल रंगाचे मातीचे भांडे लाल कपड्याने झाकून एक नारळ ठेवावा आणि नंतर राखी बांधल्यानंतर या भांड्याला वाहत्या पाण्यात टाकावे. तेव्हा भाऊ-बहिण मिळून गणेशाची पूजा करावी. असे केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि भावा-बहिणींमध्ये प्रेम टिकून राहते. यासोबतच घरात धान्याची कमतरता भासत नाही आणि गणेशाच्या आशीर्वादाने नोकरी, व्यवसायात प्रगती होते.

  • घरात सुख-समृद्धी नांदते

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिण यांनी गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे. गायीला हिरवा चारा खायला द्यावा. तुम्ही गोशाळेत गायींच्या सेवेसाठी आर्थिक मदत देखील करू शकता. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT