Purple Cabbage Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Purple Cabbage: अजब-गजब जांभळ्या रंगाची कोबी या समस्यांवर गुणकारी

Purple Cabbage Benefits: जांभळ्या कोबीचे सेवन केल्यास शरीराचे वजन कमी करता येते.

दैनिक गोमन्तक

कोबी अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. अनेकदा आपण हिरव्या रंगाची कोबी खातो, पण तुम्ही कधी जांभळ्या रंगाची कोबी खाल्ली आहे का? नसेल तर एकदा नक्की करून बघा. हिरवी कोबी अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी गुणधर्म अशा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यासोबतच जांभळ्या कोबीमध्ये आयर्न, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश होतो. याचे सेवन केल्याने तुम्ही अनेक प्रकारचे आजार बरे करू शकता. चला जाणून घेऊया त्याचे फायदे-

* पचनशक्ती चांगली राहते

जांभळ्या रंगाची कोबी (Purple Cabbage) खाल्ल्याने पचनशक्ती चांगली राहते. ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. तसेच वजन कमी करण्यासही मदत करते. वजन कमी करायचे असेल तर जांभळी कोबी खावी. 

* अल्सर समस्या

जांभळ्या रंगाची कोबी खाल्ल्याने अल्सरसारखे आजार टाळता येतात. यासोबतच ही कोबी जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. पोटदुखी कमी करायची असेल तर जांभळा कोबी खावी. 

* सूज कमी होते

जांभळ्या कोबीमध्ये भरपूर प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स असतात. ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. संधिवात सारखी समस्या असल्यास कोबी खावी. यामुळे खूप फायदा होईल. 

* वजन कमी होते

जांभळ्या कोबीमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. जर तुम्ही तुमच्या आहारात जांभळ्या कोबीचे सेवन केले तर त्यामुळे वजन झपाट्याने (Weight Loss) कमी होऊ शकते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: डिचोलीत इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

अग्रलेख: बस स्टॉपवरील 'राडा' आणि मानवता, एका फौजीच्या वेशातील देवदूताची कथा

Rohit Sharma: 'रोहित शर्मा वनडे क्रमवारीत अव्वल, विश्वासच बसत नाही!' 'हिटमॅन'च्या यशानं इंग्लंडचा क्रिकेटर स्टार थक्क

Ponda By Election: फोंड्यात भाजपची उमेदवारी कुणाला? रवी पुत्रांना सहानुभूती; पोटनिवडणूक बिनविरोध होण्‍याची शक्‍यता कमी

SCROLL FOR NEXT