एखाद्यासमोर आपल्या भावना व्यक्त करणे सोपे नसते. जी व्यक्ती तुम्हाला आवडते आणि आयुष्यभर सोबत जगण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ती तुमच्या समोर असेल, तर काय कराल? पण तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल आणि तुमच्या भावना तिच्यासोबत खूप दिवसांपासून शेअर करायच्या असतील, तर प्रपोजल डे (Propose Day 2024) पेक्षा चांगला दिवस दुसरा असूच शकत नाही.
व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला असून 8 फेब्रुवारी हा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्ताने तुम्ही प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.
ही प्रपोज करण्याची सर्वात सामान्य आणि जुनी कल्पना आहे. परंतु आजही लोकप्रिय आहे. तुमच्या जोडीदाराला डिनर डेटला घेऊन जाऊ शकता. तुम्हाला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नसल्यास, बाहेरून ऑर्डर करू शकता. या स्वादिष्ट पदार्थांनी, सुगंधित मेणबत्त्या, फुलांनी टेबल सजवा आणि मग तुमच्या जोडीदाराला प्रपोज करा.
तुमच्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी 'Dumb Charades' गेम हा एक उत्तम पर्याय असू शकतो. लगेच प्रपोज करू नका. आधी तिला वेगवेगळ्या चित्रपटांमधून तुमच्या भावनांची कल्पना द्या आणि मग तिला सरप्राईज द्या.
जर तुम्ही दोघेही पाळीव प्राणी प्रेमी असाल तर तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांची मदत देखील घेऊ शकता. यामुळे तुमचे अर्धे काम सोपे होईल. फक्त त्यांच्या गळ्यात लहान नोटसह अंगठी बांधा. तिला प्रपोज करण्याची ही अनोखी कल्पना नक्कीच आवडेल.
जर तुमच्या जोडीदाराला बॉलीवूड गाण्यांची आवड असेल तर तुम्ही गाण्याद्वारे तुमच्या न बोललेल्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवू शकता. खास करून अशा गोष्टींसाठी बनवलेल्या रोमँटिक गाण्यांची प्लेलिस्ट तयार करा आणि त्यांना तुमच्या भावना व्यक्त करा.
बीचवर प्रपोज करू शकता
जर तुमच्या जोडीदाराला बीच आवडत असेल तर तुम्ही बीचवर फिरायला किंवा कॅंडल नाइट डिनर प्लॅन करू शकता. हे जोडीदारासाठी खास सरप्राइज असू शकते. बीचवरचे निसर्ग सौदर्य या सुंदर क्षणाला साक्षी असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.