बदलत्या जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वयाच्या तिशीनंतर महिला PCOS च्या (Polycystic Ovary Syndrome) शिकार ठरत आहेत. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही एक हार्मोनल समस्या आहे. यामध्ये, अंडाशयात लहान सिस्ट तयार होतात, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होते. PCOS ग्रस्त महिलांना अनेकदा अनियमित मासिक पाळी, जास्त केस वाढणे, पुरळ आणि वंध्यत्व यासारख्या समस्या उद्भवू शकतात. चला तर मग या सिंड्रोमची कारणे काय आहेत आणि हा आजार कसा नियंत्रित करता येतो? याबाबत तज्ञांकडून सविस्तररित्या जाणून घेऊया...
दरम्यान, महिलांमध्ये (Women) वयाच्या तिशीनंतर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमची समस्या उद्भवते. सध्या त्याची नेमकी कारणे माहित नाहीत. तथापि, डॉक्टरांचा असा विश्वास आहे की हे अनुवांशिक आणि बदलत्या जीवनशैलीमुळे ही समस्या उद्भवते. ही समस्या टाळण्यासाठी जीवनशैली सुधारण्याची गरज आहे. गाझियाबादच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वाणी पुरी रावत सांगतात, पीसीओएसची लक्षणे अगदी सुरुवातीपासूनच दिसू लागतात, परंतु महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. तसे करु नये. अशा परिस्थितीत पीसीओएसची लक्षणे जाणून घेणे गरजेचे ठरते.
डॉ. वाणी पुरी रावत सांगतात, सध्या तरी या सिंड्रोमची कोणतीही अचूक कारणे सापडलेली नाहीत. बऱ्याचदा त्यामागे अनुवांशिक कारणे असतात. याशिवाय, खराब जीवनशैली (Lifestyle) हे याचे मुख्य कारण असू शकते. हे अल्कोहोल, धूम्रपान, अस्वास्थ्यकर अन्न आणि जीवनशैलीमुळे होऊ शकते. जर त्याची लक्षणे आढळली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मेयो क्लिनिकच्या मते, PCOS च्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी, केसांची असामान्य वाढ, पुरळ, लठ्ठपणा, त्वचेवर काळे डाग पडणे, केस पातळ होणे यांचा समावेश होतो. उपचार न केल्यास वंध्यत्व देखील येऊ शकते. अशी अनेक प्रकरणे देखील दिसून येतात, जिथे महिलांना या आजारावर वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि नंतर त्यांना आई होण्यात समस्या येतात.
डॉ. वाणी पुरी रावत सांगतात, जर तुम्हाला वरील लक्षणे जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. यासोबतच जीवनशैलीत बदल करा, सकस आहार घ्या, नियमित व्यायाम करा, वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, तणाव टाळा, पुरेशी झोप घ्या तसेच मद्यपान आणि धूम्रपान टाळा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.