Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

BJP leader Rahul Balmiki Viral Video: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा मंत्री राहुल बाल्मिकी एका विवाहित महिलेसोबत स्मशानभूमीत आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
BJP leader Rahul Balmiki Viral Video
BJP leader Rahul Balmiki Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

बुलंदशहर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा मंत्री राहुल बाल्मिकी एका विवाहित महिलेसोबत स्मशानभूमीत आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना शिकारपूर कोतवाली परिसरातील कैलावन गावातील स्मशानभूमीत घडली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये राहुल बाल्मिकी हे स्थानिक नागरिकांच्या पायावर पडून क्षमा मागताना दिसत आहेत. त्यांच्या सोबत असलेली महिला दुपट्ट्याने चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक नागरिकांनी संशयास्पदरीत्या उभी असलेली कार पाहून तिथे धाव घेतली. तेव्हा गाडीत राहुल बाल्मिकी आणि एक विवाहित महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

BJP leader Rahul Balmiki Viral Video
Goa Film Festival: गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला सेलिब्रिटींची मांदियाळी! अक्षय कुमारची उपस्थिती; मोहन आगाशे यांचा सन्मान

व्हिडिओ व्हायरल

गावकऱ्यांनी राहुल बाल्मिकी यांना गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगितल्यावर, ते गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर आले आणि जमलेल्या लोकांसमोर पायावर पडून माफी मागू लागले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत असून, अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओमध्ये राहुल "भाई तुम्हारे पार पडता हूं" असे म्हणताना दिसतो. हा प्रकार सार्वजनिकपणे उघडकीस आल्यामुळे भाजपसाठीही अडचण निर्माण झाली आहे.

कोणतीही कारवाई नाही

या गंभीर घटनेनंतरही शिकारपूर पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची टीका स्थानिक पातळीवर होत आहे. एनडीटीव्हीच्या माहितीनुसार, राहुल बाल्मिकी हे सध्या फरार आहे आणि पोलिसांनी अद्याप त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केलेला नाही.

राहुल बाल्मिकी हे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा मंत्री होते आणि पक्षामध्ये त्यांना एक उदयोन्मुख चेहरा मानले जात होते. मात्र या प्रकरणावर भाजपने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. यामुळे पक्षातील शिस्तबद्धतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

BJP leader Rahul Balmiki Viral Video
LIC Fraud Goa: गोव्यात ‘एलआयसी’मध्ये 43 लाखांचा घोटाळा! संस्थेचे 30 लाखांचे नुकसान; अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

या प्रकरणाची तुलना नुकत्याच घडलेल्या मध्य प्रदेशातील भाजप नेते मनोहरलाल धाकड यांच्या प्रकरणाशी केली जात आहे. ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशातील पोलिसांची भूमिका अधिकच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com