Pneumonia Symptoms: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pneumonia Symptoms: हिवाळ्यात वृद्ध आणि मुलांना न्यूमोनियाचा धोका अधिक, अशी घ्या काळजी

हिवाळ्यात लहान मुलांना आणि वृद्धांना न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे न्यूमोनियाची लक्षणे आणि उपाय जाणून घेतल्यास या गंभीर आजारापासून रक्षण होईल.

Puja Bonkile

Pneumonia Symptoms: हिवाळा हा आरामदायी असतो. परंतु आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा ऋतू लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी धोकादायक असतो. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे या ऋतूत लहान मुलं आणि वृद्धांना फुफ्फुसाच्या संसर्गामुळे न्यूमोनियाचा धोका असतो.

या ऋतूमध्ये न्यूमोनियासोबतच श्वसनाचे इतर आजारही शरीरावर लवकर आक्रमण करतात. दरवर्षी थंडीच्या दिवसांमध्ये न्यूमोनिया आणि श्वसनाच्या आजाराचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये वाढतात. न्यूमोनियाची लक्षणे कोणती आहेत आणि हा आजार टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता हे जाणून घेऊ या.

  • निमोनियाची लक्षणे कोणती

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की निमोनिया हा फुफ्फुसाचा एक गंभीर संसर्ग आहे. या आजाराला लहान मुले, अशक्त लोक आणि वृद्ध लोक बळी पडतात. विषाणूमुळे फुफ्फुसांना सूज येते आणि फुफ्फुसे पाण्याने भरतात तेव्हा न्यूमोनियाचा संसर्ग होतो.

त्याची मुख्य लक्षणे म्हणजे ताप, खोकला आणि थकवा हे आहे. तापाबरोबरच घाम आणि थरथरही येते. श्वास घेण्यास त्रास होतो आणि श्वास घेताना फुफ्फुसातून विचित्र घरघर आवाज येतो. छातीत दुखते, भूक कमी होते किंवा थांबते.

निमोनियाने त्रस्त मुलाच्या ओठांचा आणि नखांचा रंग निळा दिसू लागतो. मुलांबरोबरच वृद्धांनाही न्यूमोनियाचा धोका जास्त असतो. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. विशेषत: मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या वृद्धांनी या ऋतूत न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी अधिक व्यायाम करणे आवश्यक आहे.

  • न्यूमोनिया टाळण्यासाठी कोणते उपाय करावे

आरोग्य तज्ञांचे मते हिवाळ्यात मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांना उबदार कपडे घालावे. जर मुलाला अँटिबायोटिक्स दिले जात असतील तर पूर्ण कोर्स करा. मुलाच्या आजूबाजूला स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. मुलांना निमोनियापासून लसीकरण करून घेणे सुनिश्चित करा. जर मुलाला सर्दी होत असेल तर त्याच्या छातीवर विक्स लावा आणि त्याला झोपवा. मुलांना काही काळ सूर्यप्रकाश देणे गरजेचे असते. यामुळे मुलाच्या शरीराला उष्णता मिळते. लहान मुले लघवी करतात तेव्हा त्यांना जास्त वेळ भिजत न ठेवता वेळोवेळी तपासत रहा. यावेळी, मुलाला डायपर घाला जेणेकरून त्याचे शरीर कोरडे राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT