Pimple Free Face With Kishmish: बदलत्या जीवनशैलीचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे योग्य आहार आणि योग्य व्यायाम यांच्यात संतुलन साधत आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते.
आजारी न पडण्याबरोबरच आपण चांगले दिसण्यासाठी देखील सतत प्रयत्न करत असतो. मात्र आपल्यापैकी अनेकजण चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्समुळे त्रस्त असतात. परंतु आपल्या घरात उपलतब्ध असणाऱ्या अनेकविध पदार्थाद्वारे या समस्यापासून सुटका करु शकतो.
आज आपण अशाच एका उपायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमची पिंपल्सची समस्या लवकरात लवकर दूर होण्यास मदत होऊ शकते. आपल्या घरात मनुके असतात ज्याचा उपयोग आपल्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी केला जाऊ शकत असल्याचे डॉक्टर प्रियंकानी एका व्हिडिओत म्हटले आहे.
चेहऱ्यावर पिंपल्स का येतात?
तुमचे रक्त अशुद्ध असेल तर तुम्हाला मुरमांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. चेहऱ्यावर चमक येण्यासाठी इतर गोष्टी कऱण्याआधी तुमचे रक्त शुद्धीकरण करणे महत्वाचे ठरते.
असा करा मनुक्यांचा उपयोग
10-15 मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी पिल्यानंतर तुमचे रक्त शुद्ध होते. हे तुम्हाला सातत्याने एक महिना करायचे आहे. हे सतत एक महिना केल्यानंतर तुमचे रक्त शुद्ध होऊन तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम आणि काळ्या डागांच्या समस्या दूर होतात.
मनुके खाण्याचे इतर फायदे
1. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकता त्यामुळे अशक्तपणा दूर होऊन तुम्हाला शरीरात ऊर्जा जाणवते.
2. दररोज रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्यास गॅसच्या समस्येपासून आराम मिळेल. हे पचनसंस्थेला सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.
3. जर तुम्हाला दररोज उत्साही राहायचे असेल तर मनुक्याचे सेवन करा. यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनक्रिया मजबूत करण्याचे काम करते.
4. मनुका इम्युनिटी वाढवण्याचे काम करते. जर तुम्ही दररोज भिजवलेले मनुके खाल्ले तर त्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.