diarrhea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: वारंवार जुलाब लागणं असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण! इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Chronic Diarrhea Causes: वारंवार जुलाब लागणे ही अनेकदा किरकोळ संसर्गामुळे होणारी समस्या मानली जाते, परंतु जेव्हा ही समस्या दिर्घकाळ राहते किंवा वारंवार उद्भवते.

Manish Jadhav

Chronic Diarrhea Causes: वारंवार जुलाब लागणे ही अनेकदा किरकोळ संसर्गामुळे होणारी समस्या मानली जाते, परंतु जेव्हा ही समस्या दिर्घकाळ राहते किंवा वारंवार उद्भवते, तेव्हा ते एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकते. ही केवळ फूड पॉयझनिंग किंवा दूषित पाण्यामुळे होणारी समस्या नाहीतर पचनसंस्थेतील कोणताही जुनाट आजार (क्रोनिक डिसीज), हार्मोनल असंतुलन किंवा टीबी (क्षयरोग) किंवा कर्करोगासारख्या गंभीर संसर्गाची चेतावणी देखील असू शकते. अशा परिस्थितीत या समस्येकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

एम्स दिल्लीच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे माजी डॉ. अनूप सराया यांनी सांगितले की, पावसाळ्यात जुलाब होणे ही एक सामान्य समस्या बनून जाते. परंतु याकडे नेहमीच हवामानाचा परिणाम मानून दुर्लक्ष करणे योग्य नाही. पावसाळ्यात दूषित पाणी आणि अन्न सहजपणे संसर्ग पसरवू शकते, ज्यामुळे वारंवार लूज मोशनची समस्या उद्भवू शकते. तथापि, जर ही समस्या पाऊस थांबल्यानंतरही कायम राहिली किंवा दरवर्षी याच हंगामात वारंवार होत असेल तर हे इर्रिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS), इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज (IBD) किंवा पचनसंस्थेच्या कमकुवतपणाचे संकेत देखील असू शकते. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेण्यासोबतच वारंवार होणाऱ्या जुलाबाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

संसर्ग हे सर्वात सामान्य कारण

बहुतेक प्रकरणांमध्ये वारंवार जुलाब होण्याचे कारण बॅक्टेरियल, व्हायरल किंवा पॅरासिटिक संसर्ग असते. हे सहसा दूषित अन्न किंवा पाण्याच्या सेवनाने होते. फूड पॉयझनिंग, गॅस्ट्रोएन्टेरायटिस किंवा अमीबायसिससारख्या स्थितींमध्ये काही दिवसांपर्यंत लूज मोशन होऊ शकतात. परंतु, जर ही समस्या एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली, तर केवळ संसर्ग मानणे चुकीचे ठरेल.

कधी असू शकते हे मोठ्या आजाराचे लक्षण?

जर जुलाबासोबत रक्त येत असेल, भूक कमी लागत असेल, वजन वेगाने घटत असेल किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर हे कोलन कॅन्सर (Colon Cancer), ट्यूमर (Tumor) किंवा स्वादुपिंडाशी (Pancreas) संबंधित समस्यांचे संकेत असू शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून त्वरित तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.

औषधे आणि जीवनशैलीचा प्रभाव

काही औषधे, जसे की अँटिबायोटिक्स किंवा कर्करोगाच्या उपचारांची औषधे, आतड्यांचे संतुलन बिघडवू शकतात आणि दीर्घकाळ जुलाबाचे कारण बनू शकतात. याव्यतिरिक्त, तणाव, चुकीचे खाणेपिणे, फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे (processed food) जास्त सेवन देखील पचनसंस्थेवर परिणाम करते.

डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा?

जर तुम्हाला आठवड्यातून अनेक वेळा लूज मोशन होत असतील आणि ही प्रक्रिया अनेक आठवड्यांपासून सुरु असेल, तर याकडे दुर्लक्ष करु नका. यासोबतच जर इतर लक्षणे देखील दिसत असतील, तर डॉक्टरांशी (Doctors) संपर्क साधा. तपासणीसाठी स्टूल टेस्ट (मल तपासणी), ब्लड टेस्ट (रक्त तपासणी) किंवा कोलोनोस्कोपीची (Colonoscopy) आवश्यकता असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Final Host Nation: भारताला पुन्हा डावललं, पुढील 3 'WTC Final'चं यजमानपद 'या' देशाकडे; ICC ची मोठी घोषणा

India Justice Report: देशात न्याय वितरणात गोव्याची स्थिती बिकट, CM सावंत यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; इंडिया जस्टिस रिपोर्टमधून खुलासा

Indonesia Ship Fire: इंडोनेशियात जहाजाला भीषण आग, प्रवाशांनी समुद्रात घेतल्या उड्या; थरारक VIDEO व्हायरल!

Virat Kohli 5 Morning Habits: तुम्हीही व्हा विराटसारखे 'सुपरफिट'! कोहलीच्या फिटनेसचे रहस्य उघड, त्याची सकाळची 'ही' खास सवय माहितीय का?

हातात AK47 घेऊन फोटो! सक्तीने 'धर्मांतरण' करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातील महिलेसह 10 जणांना अटक

SCROLL FOR NEXT