Permanent Hair Straightening
Permanent Hair Straightening Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Straightening: केस स्ट्रेटनिंग करणं ठरू शकतं कॅन्सरचं कारण; कसं ते वाचाच

दैनिक गोमन्तक

Permanent Hair Straightening: सुंदर आणि आकर्षक दिसण्यात केसांचा मोठा वाटा असतो. रेशमी चमकदार केस सर्वांना हवे असतात. अशा स्थितीत हेअर स्ट्रेटनिंगची क्रेझ आजकाल महिलांमध्ये पाहायला मिळत आहे.त से, केस स्ट्रेट करण्याचे दोन प्रकार आहेत, एक तात्पुरते आणि दुसरा कायमचे.

पण टेम्पोरेरी काहीच काळ टिकते तर पर्मनंट स्ट्रेटनिंग काही वर्षे टिकते. स्ट्रेटनिंग दिसायला सुंदर, आटोपशीर आणि स्टायलिश, पण तुम्हाला माहीत आहे का की ही स्टाईल तुमच्यासाठी घातकही ठरू शकते. केस स्ट्रेटनिंग प्रक्रियेत ज्या प्रकारचे रासायनिक द्रावण वापरलं जातं, ते केल्यास कर्करोगाचा धोका असतो.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात अमेरिकन संशोधकांनी दावा केला आहे की केस स्ट्रेटनिंग क्रीममध्ये आढळणाऱ्या रसायनांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट होतो. गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे

  • वजन कमी होणे

  • ओटीपोटात आणि पाय दुखणे

  • अनियमित मासिक पाळी

  • दुर्गंधीयुक्त डिस्चार्ज

  • लघवी करताना त्रास

  • मूत्रामध्ये रक्त

  • अशक्तपणा

संशोधन काय सांगतं?

जगभरात दरवर्षी सुमारे 5 लाख महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा त्रास होतो, विकसनशील देशांमध्ये 85 टक्के महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका असतो, भारतातील 30 ते 59 वयोगटातील 36 टक्के महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होतो.

हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात सहज पसरू शकतो, ज्या महिला वर्षातून 4 पेक्षा जास्त वेळा केमिकलयुक्त हेअर स्ट्रेटनर वापरतात, त्यांच्यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची लक्षणे जास्त आढळून येतात. त्यामुळे स्ट्रेटनिंग करणे जरी सुंदर वाटत असले तरी त्याचे तोटेही लक्षात घेणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT