Heart Attack  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Heart Attack: विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका; संशोधनातून खुलासा

Heart Disease Airport Pollution: विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.

Manish Jadhav

Heart Disease Airport Pollution: जर तुम्ही विमानतळाजवळ राहत असाल तर ही बातमी नक्की वाचा. विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. चकित झालात ना... अलिकडेच आलेल्या एका संशोधनातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. संशोधनात असे म्हटले आहे की, ज्या लोकांचे घर विमानतळाजवळ आहे त्यांना इतरांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. याचे मुख्य कारण म्हणजे वायू प्रदूषण आणि मोठा आवाज. प्रदूषण आणि मोठ्या आवाजामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

संशोधनानुसार, हे केवळ वृद्धांपुरते मर्यादित नाही तर तरुणांवरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. अशा आवाजाच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढतो.

जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, विमामनतळापासून दूर राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत जवळ राहणाऱ्या लोकांना 10-20 टक्के धोका जास्त आढळून आला आहे. तर दुसरीकडे, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळून आले की, विमानतळांजवळ राहणाऱ्या लोकांना गंभीर आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ही समस्या प्रामुख्याने विमानांच्या टेकऑफ, लँडिंग आणि विमानतळाशी संबंधित वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) उद्भवते.

तज्ञ काय सांगतात?

तज्ञांच्या मते, विमानतळाजवळील (Airport) आवाज आणि प्रदूषणाच्या सतत संपर्कात राहिल्याने शरीरावर ताण येतो. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. अशा लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकचा धोका जास्त असतो.

ध्वनी प्रदूषणाचे परिणाम

विमाने आणि वाहतुकीतून येणारा आवाज 24 तास लोकांच्या कानावर पडतो, ज्यामुळे ताण येतो. याशिवाय, आवाज आणि अल्कोहोलमुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त दबाव येतो.

श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त

विमानतळाभोवतीचे वायू प्रदूषण देखील आरोग्याच्या समस्यांसाठी जबाबदार आहे. विमानांमधून निघणाऱ्या विषारी वायू आणि वाहतुकीतून निघणाऱ्या धुरामुळे बहुतेक लोक आजारी पडत आहेत. वायू प्रदूषणामुळे लोकांच्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर नकारात्मक परिणाम होत आहे. बहुतेक लोक श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT