Diabetes And Cancer: सावधान! मधुमेहाच्या रुग्णांना दररोज इन्सुलिन घेतल्याने होऊ शकतो कॅन्सर!

मधुमेहाचे रुग्ण रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज इन्सुलिनचे डोस घेतात. याने रक्तातील साखर नियंत्रित राहते, पण त्याचे काही गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.
Diabetes
DiabetesDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात लाखो लोक मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त आहेत. मधुमेहाचे साधारणपणे दोन प्रकार असतात. टाइप 1 मधुमेहामध्ये, रुग्णांच्या शरीरात इन्सुलिनचे उत्पादन एकतर थांबते किंवा फारच कमी प्रमाणात बनते. टाईप 2 मधुमेहामध्ये रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन तयार होते परंतु प्रतिकारशक्तीमुळे त्याचा योग्य वापर होत नाही. दोन्ही स्थितींमध्ये रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते.

(Diabetes And Cancer)

Diabetes
Health Care Tips: सावधान! आयुर्वेदानुसार हे पदार्थ तुमच्या त्वचेच्या समस्या वाढवू शकतात...

टाईप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज इन्सुलिनचा डोस घ्यावा लागतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात टाइप 1 मधुमेह आणि इन्सुलिन यांच्यातील संबंध उघड झाला आहे. याबद्दल जाणून घ्या.

इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढतो?

एका अभ्यासातून समोर आले आहे की टाइप 1 मधुमेहाचे रुग्ण जे दररोज इन्सुलिनचे डोस घेतात त्यांना कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेही रुग्णांना दिवसातून अनेक वेळा इंजेक्शन किंवा पंपाद्वारे इन्सुलिनचा डोस घ्यावा लागतो. असे केल्याने, टाइप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांना अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. तथापि, मधुमेह आणि कर्करोगाचा थेट संबंध नाही. इन्सुलिन आणि कॅन्सरचा काय संबंध आहे हे अजून समजू शकलेले नाही. मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच इन्सुलिनचा डोस घ्यावा. ओव्हरडोज घेणे देखील धोकादायक ठरू शकते.

Diabetes
Skin Care Tips: फक्त चवच नाही तर सौंदर्य देखील वाढवते 'दालचिनी' जाणून घ्या कसे

टाइप 1 मधुमेहाची झपाट्याने वाढणारी प्रकरणे

नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासात, शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की 2040 पर्यंत जगभरात टाइप 1 मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होईल. 2021 मध्ये, T1D रुग्णांची संख्या सुमारे 84 लाख होती, जी 2040 मध्ये 1.74 कोटीपर्यंत वाढेल. अभ्यासात असेही सांगण्यात आले की सध्या टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त 1.5 दशलक्ष लोक 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर 54 लाख लोकांचे वय 20 ते 59 वर्षे दरम्यान आहे. मधुमेह तरुणांनाही आपल्या कवेत घेत आहे.

टाइप 1 मधुमेह हा असाध्य रोग आहे का?

तज्ज्ञांच्या मते, टाइप 1 मधुमेह उपचाराने पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवल्यास रुग्ण कोणतीही गंभीर परिस्थिती टाळू शकतात. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी औषधे आणि इन्सुलिनचे डोस आवश्यक आहेत. अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. निष्काळजी राहणे महागात पडू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com