Parenting Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलांशी बोलताना पालकांनी 'या' चुका करू नये, अन्यथा...

Parenting Tips: पालकांनी मुलांशी बोलतांना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

Puja Bonkile

parenting tips avoid these things while you talk your child read full story

लहान मुलांचे संगोपन करणे सोपे नाही. पालकांचे मुलांशी नातं जितके घट्ट असते तितके संवेदनशील देखील असते. पण अनेकवेळा पालकांकडून नकळतपणे चुका होतात, ज्यामुळे पालकच अडचणीत येऊ शकतात. यामुळे मुलांचे संगोपन करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणूव घेऊया.

  • बाळासोबत झोपने

सुरूवातीला अनेकदा महिला लहान मुलांना जवळ घेऊन झोपतात. असे करू नका कारण घरतील काम सोडून तुम्हाला मुलांजवळ झोपावे लागते. तसेच मुले मोठे झाले की त्यांना एकटे झोपण्याची सवय राहत नाही.

  • मांडीवर घेतल्याने मुलं बिघडतात

तुम्ही अनेकदा लोकांचे म्हणणे ऐकले असेल की, जर तुम्ही मुलाला सतत आपल्या मांडीवर ठेवत असाल तर लाडामुळे तो बिघडू लागतो. या सल्ल्याकडे लक्ष देऊ नका. लहान मुलांना प्रेम आणि काळजीची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या पालकांचा पाठिंबा हवा असतो. त्यांच्या सहवासामुळे त्यांचे तुमच्याशी असलेले नातं अधिक घट्ट होते.

  • आर्थिक गोष्टी न सांगणे

लहान मुल हट्टी असणे सामान्य आहे. अशा वेळी मुलाला रागावून न सांगता शांतपणे प्रेमाने समजावून सांगावे. मुलांना आपली आर्थिक बाजू कशी आहे हे सांगावे. यामुळे ते कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करणार नाही.

  • कृतज्ञता दाखवणे

अनेक लोक आपल्या मुलांना चांगले संगोपन केल्याबद्दल किंवा त्यांना या जगात आणल्याबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतात. अशी चूक करू नका. असे केल्याने तुम्ही तुमच्या मुलाचा आत्मविश्वास कमकुवत करत आहात आणि त्याच्या मनात निराशा निर्माण करत आहात. लक्षात ठेवा, तुमच्या मुलाला जगात आणण्याची तुमची निवड होती. तुम्ही त्याच्यावर उपकार करत आहात असे त्याला नेहमी वाटणे योग्य नाही.

  • रडणे थांबवणे

कोणतेही पालक आपल्या मुलाला रडताना पाहू शकत नाही. परंतु असे काही वेळा आहेत जेव्हा आपण ते होऊ द्यावे. जर मुलाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असेल तर त्याला थोडा वेळ रडू द्या. यासह, मूल स्वतःला बरे करून समस्यांशी लढायला शिकतात. अशा वेळी, आपण आपल्या मुलाच्या आसपास राहून त्याला आधार दिला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT