Paper Bag Day 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Paper Bag Day 2022: का साजरा केला जातो पेपर बॅग डे?

Paper Bag Day 2022: प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करता कागदी पिशव्यांचा वापर करावा या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

दरवर्षी पेपर बॅग डे 2022 हा 12 जुलै रोजी साजरा केला जातो. प्लास्टिक ऐवजी कागदी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती करणे हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. आजच्या काळात लोक प्लास्टिकचा अधिक वापर करतात, त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. वायू प्रदूषण असो की जलप्रदूषण या दोन्हीसाठी प्लास्टिक घातक ठरत आहे. हे आपल्या पर्यावरणासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदी पिशव्यांचा (Paper Bag) वापर केल्यास प्रदूषणालाही आळा बसू शकतो. यामुळे कागदी पिशव्यांचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. आजचा लेख याच विषयावर आहे. (Paper Bag Day 2022 News)

* पेपर बॅग डे साजरा करण्याचा इतिहास

फ्रान्सिस वोले नावाच्या अमेरिकन शोधकाने 1852 मध्ये जगातील पहिले पेपर बॅग मशीन बनवले. यानंतर, 1871 मध्ये मार्गारेट ई नाइटने आणखी एक मशीन विकसित केली. ज्याने सपाट तळाशी कागदाची पिशवी तयार केली. त्यावेळी किराणा पिशव्यांची जननी म्हणून त्याचे नाव प्रचलित झाले. त्यांनी बनवलेल्या कागदी पिशव्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जात होत्या. काही वर्षांत, चार्ल्स स्टिलवेल, चार्ल्स स्टिलवेल आणि वॉल्टर डॉबनर यांसारख्या अनेक शोधकांनीही कागदी पिशवीला नवीन डिझाइन दिले.

* कागदी पिशव्या वापरण्याचे फायदे

  • कागदी पिशव्यांचा केवळ पुनर्वापर करता येत नाही तर त्या केवळ 1 महिन्यात विघटितही होऊ शकतात.यामुळे पर्यावरणाची (Environment) होणारी हानी टाळता येइल.

  • प्लॅस्टिक पिशव्यांच्या तुलनेत कागदी पिशव्या प्राण्यांसाठी हानिकारक नाहीत.

  • प्लॅस्टिकच्या पिशव्या बनवण्यासाठी जास्त ऊर्जा आणि कागदी पिशव्या बनवण्यासाठी कमी ऊर्जा लागते.

  • कागदी पिशव्यां वारपण्यास स्वस्त आहेत.

  • कागदी पिशव्या त्यांच्या विविध सुंदर रंगामुळे आणि त्यावरील प्रिंट्समुळे वापरायला छान वाटतात.

  • खराब झालेल्या कागदी पिशव्यांचा तुम्ही घरी खत बनवतांनाही करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT