Pancake Recipes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pancake Recipes: असा बनवा घरच्याघरी चविष्ठ पॅनकेक

Pancake Recipes: तुमच्या आवडीच्या सिरपसोबत, फ्रूट्ससोबत सर्व्ह करा.

गोमन्तक डिजिटल टीम

आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात जे नेहमीच खवय्येगिरी करताना दिसतात. काहींना फक्त खायला आवडते तर काहींना करुन खाणे आणि खाऊ घालणे हा प्रकारही आवडतो. असे लोक नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी करुन बघण्यात आपला आनंद शोधताना दिसतात.

आज आपण अशा एका पदार्थाची रेसिपी बघूयात जो पदार्थ सर्वाना खायला आवडतो. विशेषत: लहान मुलांना असे पदार्थ आवडतात. हा पदार्थ म्हणजे पॅनकेक होय. लहानांपासून मोठ्यापर्यत सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणून ओळखला जातो. हा पॅनकेक खाताना जितका चवदार लागतो तितकाच तो घरी करण्यासदेखील सोपा आहे.

साहित्य :

२०० ग्रॅम मैदा, १५ ग्रॅम मध, १० ग्रॅम बेकिंग पावडर, २ ग्रॅम सोडा, चिमूटभर मीठ,

४० ग्रॅम बटर, १५० मिलीलिटर दूध, २५ मिलीलिटर संत्र्याचा रस, ऑरेंज झेस्ट २ ग्रॅम.

कृती :

सर्व कोरडे साहित्य मिसळा आणि चाळून घ्या. त्यामध्ये वितळलेले लोणी किंवा बटर घाला आणि चांगले मिसळा. पीठ चांगले होण्यासाठी लोणी किंवा बटर आधी घातलं पाहिजे. बटर घालताना ते वितळून घालणे महत्वाचे ठरते.

1.आता यात दूध व ऑरेंज ज्यूस घालून व्यवस्थित मिक्स करा व गाळून घ्या.

2.थंड करण्यासाठी हे मिश्रण थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा.

3.मध्यम तापलेला तव्यावर पीठ घाला, पसरू नका.

4.एकदा जाळी दिसली, की उलटा आणि दुसऱ्या बाजूने शिजवा.

5.तुमच्या आवडीच्या सिरपसोबत, फ्रूट्ससोबत सर्व्ह करा.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॅनकेक बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता आपल्या कुटुबियांनादेखील देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalsa Banduri Project: 'कळसा-भांडुरासाठी लवकर दाखले द्या'! कर्नाटक CM सिद्धरामय्‍यांचे PM मोदींना साकडे; पत्र लिहून केली मागणी

Goa Police: '..अशीच स्थिती राहिल्यास गोव्‍यात पर्यटनालाही धाेका'; सरदेसाईंचा इशारा; पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर ठेवले बोट

Goa Crime: 4 वर्षांपूर्वी झोपडीत झाला खून, आरोपींना आधी आजीवन कारावास, नंतर निर्दोष सुटका; काय घडले नेमके? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; पेडण्यातून नवा आमदार?

Goa Cricket: नाबाद 243 धावा, 7 विकेट्स; गोव्याच्या कर्णधाराची अष्टपैलू खेळी; छत्तीसगडवर दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT