Palak Paneer Cheela Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breakfast Recipe: ब्रेकफास्टमध्ये घ्या चटपटीत पनीर चिल्लाचा आस्वाद, झटपट होईल तयार

Palak Paneer Cheela: जर तुम्हाला नाश्त्यात काहीतरी वेगळं, चविष्ट आणि आरोग्यदायी खायचं असेल तर पालक पनीर चिल्ला सर्वोत्तम असेल.

दैनिक गोमन्तक

दररोज तुम्ही नाश्त्यासाठी काहीतरी नवीन पदार्थ बनवता. अनेक वेळा एकच एकच पदार्थ खाऊन घरातील लोक कंटाळतात. अशा वेळी जर त्यांना काहीतरी वेगळं आणि खास खावंसं वाटत असेल तर तुम्ही पालक पनीर चील्ला ट्राय करू शकता. हे खूप चविष्ट आहे आणि तयार होण्यास वेळ लागत नाही. पालक पनीर चील्ला (Palak Paneer Cheela) नाश्त्यामध्ये खाणे देखील आरोग्यदायी (Healthy) आहे.

पालक पनीर चील्लासाठी लागणारे साहित्य

  • बेसन - 2 कप

  • मूग डाळ - 2 कप

  • पालक, प्रमाणानुसार

  • लाल मिरची

  • तेल

  • पनीर - 100 ग्रॅम

  • चाट मसाला

  • गरम मसाला

  • मीठ - चवीनुसार

पालक पनीर चील्ला बनवण्याची कृती

  • पालक पनीर चिल्ला बनवण्यासाठी मूग डाळ रात्रभर भिजत ठेवा आणि बाजूला ठेवा. 

  • सकाळी ही मूग डाळ बारीक करून पेस्ट बनवा. त्याचबरोबर पालक पाण्यात उकळा.

  • आता एका मोठ्या भांड्यात बेसन घ्या. तसेच मूग डाळीची पेस्ट नीट मिसळा.

  • यानंतर पालकाची उकडलेली पाने बारीक करून पेस्ट बनवा. 

  • आता ही पालक पेस्ट मूग डाळ पेस्टमध्ये मिसळा. सर्वात शेवटी मीठ, तिखट, गरम मसाला घालून मिक्स करा.

  • यानंतर पनीर चांगले मॅश करा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता.आता चाट मसाला आणि लाल तिखट घालून मिक्स करा.

  • आता चवीनुसार थोडे मीठ घाला. अशा प्रकारे तुमची पेस्ट तयार होईल.

  • आता नॉनस्टिक तवा गरम करा आणि त्यात पालक आणि मूग डाळीची पेस्ट पसरवा.

  • एका बाजूने शिजल्यावर हलक्या हाताने उलटा करा. दोन्ही बाजूंनी भाजून झाल्यावर वरती पनीरचे मिश्रण ओतून लाटून घ्या. 

  • पालक पनीर चिला आता तयार आहे. तुम्ही हिरवी चटणी किंवा गोड चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT