Palak Dal Khichdi Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Palak Dal Khichdi Recipe: डिनरला बनवा चविष्ट अन् हेल्दी पालक डाळ खिचडी; वापरा ही सोपी रेसिपी

या डिशमध्ये पालक आणि मसूर या दोन्ही गोष्टी असल्याने ते मुलांसाठीही खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते

दैनिक गोमन्तक

जड अन्न आरोग्यासाठी नेहमीच हानिकारक मानले जाते. यामुळे अनेकवेळा रात्री हलके काहीतरी खावेसे वाटते. अशा परिस्थितीत लोक अशा गोष्टी शोधतात जे खाण्यास चवदार तर असतात शिवाय आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

अशा परिस्थितीत तुम्ही झटपट पालक डाळ खिचडी करू शकता. बर्‍याच वेळा लोक हा पदार्थ सकाळी आणि संध्याकाळी खातात. या डिशमध्ये पालक आणि मसूर या दोन्ही गोष्टी असल्याने ते मुलांसाठीही खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. चला जाणून घेऊया पालक डाळ खिचडी बनवण्याची रेसिपी.

पालक डाळ खिचडीसाठी लागणारे साहित्य

  • पालक - 1 कप

  • कांदा - 1 बारीक चिरून

  • तांदूळ - अर्धी वाटी

  • मसूर डाळ - 1 कप

  • जिरे - अर्धा टीस्पून

  • हळद - अर्धा टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • लाल तिखट - 1/2 टीस्पून (चवीनुसार)

  • देसी तूप - 1 टीस्पून

  • हिरवी मिरची - 2 बारीक चिरून

  • पाणी - आवश्यकतेनुसार

पालक डाळ खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण तांदूळ आणि मसूर नीट स्वच्छ करून घ्यावे. यानंतर, कोमट पाण्यात 10 मिनिटे ते भिजवून ठेवा. आता प्रेशर कुकरमध्ये तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोबत चिरलेला कांदा घाला. आता हे सर्व एकत्र चांगले तळून घ्या. यानंतर त्यात हळद आणि लाल तिखट घालून 1 मिनिटभर परतून घ्या.

यानंतर चवीनुसार मीठ घालून मसूर आणि तांदूळ घाला. आता त्यात एक ग्लास पाणी टाकून 2-3 मिनिटे शिजवा. इथे आपण पाणी वाढवू देखील शकता. आता पालक चांगले धुऊन बारीक चिरून त्यात घाला. नंतर कुकर बंद करून 10 मिनिटे शिजवा. कुकरमध्ये 2 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. तयार आहे स्वादिष्ट पालक डाळ खिचडी. खिचडी ताटात घालून देशी तूप, दही, चटणी किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

SCROLL FOR NEXT